तुषार तानाजी कांबळे यांना ‘राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार’ प्रदान
नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्ली येथे आयोजित भव्य सोहळ्यात महाराष्ट्रातील प्रभावशाली, युवा व बहुआयामी सामाजिक आणि राजकीय नेते तुषार तानाजी कांबळे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.हा सन्मान मानवाधिकार व भ्रष्टाचार विरोधी संघटना, आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन आणि रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) – श्रमिक ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आला.
सामाजिक न्याय, जनजागृती, शिक्षण, ग्रामीण भागातील मुलभूत प्रश्न, वंचित घटकांचे हक्क आणि पत्रकारितेच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल म्हणून हा पुरस्कार कांबळे यांना प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक सतीश केदारी, अध्यक्ष – महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) श्रमिक ब्रिगेड होते. त्यांच्या नेतृत्वामुळे आणि काटेकोर व्यवस्थापनामुळे हा सोहळा अत्यंत यशस्वी ठरला.
समारंभाचे अध्यक्षस्थान केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री माननीय श्री रामदासजी आठवले यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर तुषार तानाजी कांबळे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले—
“हा सन्मान माझ्या सामाजिक कार्याची दखल असून समाजासाठी अधिक निष्ठेने कार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे. ‘तथ्य क्रांती’च्या माध्यमातून सत्य, न्याय आणि जागृतीचा मार्ग अधिक वेगाने पुढे नेणार आहे.”
कांबळे यांच्या या राष्ट्रीय सन्मानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात, कोकणात तसेच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

!doctype>
Post a Comment
0 Comments