*जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांची डी. आर. ग्राफिक्सला सदिच्छा भेट*
निपाणी/ प्रतिनिधी :कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज म्हणून ओळख असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मा. उत्तम कांबळे दादा यांनी काल डी. आर. ग्राफिक्स येथे सदिच्छा भेट दिली.
यावेळी डी. आर. ग्राफिक्स येथे आमचे मार्गदर्शक प्रा. सुरेश कांबळे सर, पिंटूअण्णा माने, आरेशदादा सनदी रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बी आर कांबळे साहेब, कागल तालुका सरचिटणीस सचिन मोहिते, तसेच दादांचे सहकारी उपस्थित होते.
समाजातील दोन होतकरू युवक व्यवसाय क्षेत्रात प्रामाणिकपणे व चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचे पाहून उत्तम कांबळे दादा यांनी समाधान व्यक्त केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.दादांनी दिलेल्या या सदिच्छा भेटीबद्दल डी. आर. ग्राफिक्स परिवाराकडून त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

!doctype>
Post a Comment
0 Comments