Type Here to Get Search Results !

No title

कुर्डूसारखा मुरूम घोटाळा सांगोल्यातही ! ग्रीन झोनमध्ये बेकायदेशीर प्लॉटिंग ; धनवान मत्तबरांवर इडी-सी.बी.आय ची लवकरच टांगती तलवार.


माणदेश मैदान न्युज :- कार्यकारी संपादक 

      सांगोला तालुक्यातील महुद रोड परिसरात कुर्डूसारख्या घोटाळ्याचे सावट दिसू लागले आहे. श्री गणेश मंदिराच्या पाठीमागील बाजूस ग्रीन झोनमध्ये मोडणारा गट नंबर 460, 461, 462, 463, 464 व 466 या क्षेत्रात बेकायदेशीररीत्या नियम धाब्यावर बसवून प्लॉटिंग सुरू असून, निरपराध नागरिकांची सरळसरळ फसवणूक होत आहे.या प्रकरणात काही मात्तबर,धनवान धनदांडग्या व राजकीय छत्रछायेखालील व्यक्तींचा थेट सहभाग असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. बेकायदेशीर व्यवहारांतून निर्माण झालेली बेहिशेबी संपत्ती लपवण्यासाठी या लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून मालमत्ता उभारली असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

      स्थानिक नागरिकांनी सांगोला तहसीलदार, मुख्याधिकारी सांगोला नगरपरिषद व जिल्हा प्रशासन,महसूल व नगररचना विभागाकडे लेखी तक्रार करूनही कारवाई न केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय सांगोल्यातील या मत्तबर व धनवान व्यक्तींवर इडी (अंमलबजावणी संचालनालय) आणि सीबीआयमार्फत चौकशी करून त्यांच्या बेहिशोबी मालमत्तेची तपासणी लवकरच होणार हे मात्र नक्कीच.नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या प्लॉटिंग घोटाळ्याने प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत असून, “सांगोल्यातील कुर्डूसारखीच परिस्थिती निर्माण होऊ देणार का?” असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.


माणदेश मैदान न्युज - भाग 9

सांगोल्यातील ग्रीन झोन असलेल्या जमिनीच्या  व्यवहारातील चौकशी करण्यासाठी ED सीबीआय पथक लवकरच सांगोल्यात दाखल होणार . 



Post a Comment

0 Comments