Type Here to Get Search Results !

No title

सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांच्या वाहनाला टोल मधून सूट मिळणे बाबत पत्रकार सुरक्षा समिती मंगळवारी उतरणार रस्त्यावर..!


माणदेश मैदान न्युज :- सोलापूर प्रतिनिधी 

       पत्रकार हा लोकशाहीचा मजबुत चौथा स्तंभ असून ऊन,वारा,पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांना राजकीय सामाजिक शैक्षणिक त्याच बरोबर प्रशासनाच्या बातम्या करण्यासाठी तालुका व विविध ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या ठिकाणी कधी दुचाकी तर कधी चारचाकी वाहनातून प्रवास करावा लागतो.जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय,पोलीस अधीक्षक कार्यायल,जिल्हा परिषद, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय,सिव्हिल हॉस्पिटल,जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय,जिल्हा उद्योग कार्यालय तसेच विविध महामंडळाचे कार्यालय अशी अनेक शासकीय कार्यालये जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तसेच आमदार - खासदार कॅबिनेटमंत्री राज्यमंत्री यांचे दौरे नियोजन बैठका सभा मेळावे बऱ्यांच वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने वार्ताकंन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी चार चाकी वाहनाने यावं लागत आहे.ग्रामीण भागातील काही पत्रकारांकडे चारचाकी वाहने असल्याने त्यांना नेहमीच सोलापूरला वृत्त संकलन करण्यासाठी टोल भरून यावं लागतं आहे.शासकीय वृत्तसंकलन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकार बांधव रोजच जिल्ह्याच्या ठिकाणी येत असल्याने टोलचा आर्थिक भुर्दंड पत्रकार बांधवाना सहन करावा लागत आहे.

       याबाबत पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने दि. 16/7/2025 रोजी सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले होते.या टोलमाफी विषयी मा.विभागीय आयुक्त यांना देखील दिनांक 12/9/2025 रोजी पुणे येथे भेटून निवेदन सादर करण्यात आले होते.

       महाराष्ट्र राज्य सरकार पत्रकारांच्या प्रश्नावर नेहमीच उदासीन भूमिका घेत असून पत्रकारांच्या प्रश्नावर निर्णय घेण्यास नेहमीच विलंब होत असल्याने अखेर पत्रकार सुरक्षा समितीने रस्त्यावर उतरण्याचा निर्धार केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी प्रसार माध्यमांना दिली असून सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांच्या चारचाकी वाहनांना टोल मधून सूट मिळणे बाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दिनांक 23/9/2025 रोजी पत्रकारांना घेऊन सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती रस्त्यावर उतरून लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments