सांगोल्यातील तहसील कार्यालय येथील प्रमुख संविधानिक पदावर कार्यरत असलेले लोकसेवक यांची एका सबंधीत पत्रकारास अपमानास्पद वागणूक.
माणदेश मैदान न्युज - कार्यकारी संपादक
सांगोला तालुक्यातील तहसील कार्यालय मधील प्रमुख व संविधानिक पदावरील लोकसेवकाने पत्रकारास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना दि.१९/०९/२०२६ रोजी घडली आहे.महसूल गौण खनिज विभागातील काही बातमीपत्र प्रकाशित केल्यामुळे हा दबाव आणल्याची चर्चा असून,पत्रकार संघटनांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व संबंधित सांगोला तहसील कार्यालयातील प्रमुख लोकसेवकावर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो.त्याचे काम म्हणजे प्रश्न विचारणे आणि सत्य जनतेसमोर मांडणे परंतु सांगोला तालुक्यात तहसील कार्यालयातील प्रमुख संविधानिक पदावरील लोकसेवकानेच पत्रकाराला गुन्ह्याची धमकी देणे हे लोकशाहीला काळिमा फासणारे आहे.लोकशाहीने शासकीय अधिकाऱ्यांना देऊ केलेल्या अधिकाराचा अयोग्य वापर करून पत्रकारांना गप्प बसविण्याचा प्रयत्न होणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे.अशा प्रवृत्तीवर संबंधित लोकसेवकावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे,अन्यथा पत्रकारितेची मुळं उखडली जातील आणि लोकशाही केवळ नावालाच राहील.याबाबत पत्रकार सुरक्षा समिती सांगोला यांचे मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर, प्रांत कार्यालय मंगळवेढा, या ठिकाणी सदर तक्रार दाखल करण्यात आली आहे.लवकरच सांगोला तालुक्यातील तहसील कार्यालयातील प्रमुख पदावरील अधिकारी याच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी होणार हे मात्र निश्चित.
माणदेश मैदान न्युज
भाग नंबर - 3 लवकरच..!
पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न - तहसील कार्यालय प्रमुखांचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात.

!doctype>
Post a Comment
0 Comments