सांगोल्यात महुद रोड नाजिक मुरूम चोरीचे थैमान नागरिकांमध्ये महसूल गौण खनिज विभागाचे मौन संशयास्पद संबंधित ठिकाणचा पंचनामा करूनही ; अवैध मुरूम उत्खननाला प्रोत्साहन? आर्थिक मिलीभगत झाल्याची जनतेमधून चर्चा.
माणदेश मैदान न्युज - (कार्यकारी संपादक)
सांगोला तालुक्यातील महुद रोड परिसर नजिक अवैधरित्या मुरूम चोरीचे थैमान सुरू असून, यामुळे स्थानिक नागरिकांत तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.संबंधित ठिकाणाचा पंचनामा महसूल गौण खनिज विभागाकडून करण्यात आला असला तरीही मुरूम उत्खनन सुरूच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विभागाचे मौन संशयास्पद ठरत असून, अवैध उत्खननाला प्रोत्साहन मिळत असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.
मुरूम माफियांनी सर्रास सरकारी नियमांना डावलून अवैध उत्खनन सुरू ठेवले आहे.या प्रकारामुळे महसूल विभागाला प्रचंड आर्थिक तोटा होत असून, शासनाची महसुली हानी होत आहे.तरीदेखील अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आर्थिक मिलीभगत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.
या अवैध उत्खननामुळे परिसरातील पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.जमिनीची धूप, शेतीचे नुकसान आणि वाहतुकीसाठी रस्त्यांची हानी अशा समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहेत.शेतकरी व ग्रामस्थांना थेट त्रास होत असून, प्रशासन मात्र शांत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
“पंचनामा हा केवळ कागदोपत्री राहिला आहे.प्रत्यक्ष कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही,” असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
माणदेश मैदान न्युज 💥
पुढील भाग नंबर 6 लवकरच...!
कुर्डूसारखा मुरूम उत्खनन घोटाळा सांगोल्यातही; कुर्डूतील त्याच वरिष्ठ राजकीय नेत्याच्या आशीर्वादाची दाट शक्यता..!

!doctype>
Post a Comment
0 Comments