Type Here to Get Search Results !

आमदार साहेब तुमच्या कामाला सलाम...*

 *आमदार साहेब तुमच्या कामाला सलाम...*

 माणदेश मैदान न्युज / गेले‌ अनेक दिवस झाले राज्यभर पावसाने थैमाल‌ घातले आहे.सांगोला‌ तालुक्यात गेले आठ दिवस‌ रोज पाऊस पडत आहेऋ चार दिवसांत तर अक्षरशा‌ मुसळधार पाऊस पडला त्यामुळे नदी,नाले ओढे तुडुंब भरून वाहु लागले आहेत.या पाण्याने शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे.अनेक नागरीकांच्या घरात पाणी घुसले आहे.तसेच अनेक रस्त्यांचे नुकसान झाले आहे.अनेक पुल वाहुन गेले आहेत.

     काल मंगळवारी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुरा गोरे सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी सर्व नुकसानीची माहीती देऊन नागरीकांना भरपाई देण्याची मागणी केली होती तसेच रस्त्याची दुरुस्ती व पुल बनवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली होती.

   बुधवार दिनांक २३ /९/२०२५ रोजी आपले लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेब यांची मुंबई येथे भेट घेऊन.सांगोला तालुक्यात झालेल्या पिकांचे , रस्त्याचे ,पुलाचे व घरांचे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेबांना दिली. व मा.मुख्यामंत्री साहेबांनी सर्व माहीती वाचुन त्यावर ताबडतोब उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले.

   आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी गेले चार पाच दिवसात बहुतांश भागांना भेटी दिल्या व झालेल्या नुकसानीची माहीती आज तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस साहेब यांना कळविल्याने आमदार साहेबांच्या कामाचे कौतुक सगळीकडे होत असल्याचे माहीती भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments