कुर्डूसारखा मुरूम उत्खनन घोटाळा सांगोल्यातही ; कुर्डूतील त्याच वरिष्ठ राजकीय नेत्याच्या आशीर्वादाची दाट शक्यता..!
माणदेश मैदान न्युज:- कार्यकारी संपादक
सांगोला तालुक्यातील अवैध मुरूम उत्खनन प्रकरणाने पुन्हा एकदा उचांक गाठला आहे.कुर्डू प्रकरणाने जिल्ह्यात गाजावाजा झाल्यानंतर,आता सांगोल्यातही तसाच घोटाळा उघड झाल्याची चर्चा रंगत आहे.विशेष म्हणजे या अवैध उत्खननामागे कुर्डूतीलच एका प्रभावी वरिष्ठ राजकीय पक्षाच्या त्याच नेत्याचा आशीर्वाद असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
महसूल विभागाचे लाखो -कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून पर्यावरणाची नासधूस करणारे हे उत्खनन प्रशासनाच्या डोळ्यांसमोर दिवसरात्र सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी कारवाईचा प्रयत्न केला तरी स्थानिक प्रभावी काही नेतेमंडळी दबाव टाकून कारवाई थांबवत असल्याचे समजते.
कुर्डू घोटाळ्यानंतर जिल्हाधिकारी यांनी महसूल गौण खनिज विभागाने कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.मात्र सांगोल्यातील वास्तव पाहता प्रशासनावर पुन्हा राजकीय दबावाचे सावट स्पष्ट दिसत आहे.सुजाण नागरिकांनी प्रांत अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे की अवैध उत्खननास राजकीय आश्रय देणाऱ्या वरिष्ठ नेत्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी.
पुढील भाग नंबर 7
माणदेश मैदान न्युज..
कुर्डूसारखा मुरूम घोटाळा सांगोल्यातही! ग्रीन झोनमध्ये असलेल्या जमिनीची बेकायदेशीरित्या नियमबाह्य प्लॉटिंग..!

!doctype>
Post a Comment
0 Comments