Type Here to Get Search Results !

No title

कुर्डूसारखा मुरूम घोटाळा सांगोल्यातही! ग्रीन झोनमध्ये असलेल्या जमिनीची बेकायदेशीरित्या नियमबाह्य प्लॉटिंग..!


माणदेश मैदान न्युज - कार्यकारी संपादक 

          सांगोला तालुक्यातील महुद रोड परिसरात लगतच कुर्डूसारखाच बेकायदेशीर नियम धाब्यावर बसवून मुरूम उत्खनन आणखी एक गंभीर घोटाळा उघडकीस आला आहे.गणपती मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेला जमीन गट नंबर 460, 461, 462, 463, 464 व 466 हा ग्रीन झोनमध्ये मोडणारा असून या ठिकाणी बेकायदेशीररीत्या नियमबाह्य नगरपरिषद,तहसीलदार सांगोला, प्रांताधिकारी मंगळवेढा, जिल्हाधिकारी सोलापूर,भू नगर रचना विभाग सोलापूर यांची कोणतीही पुर्व परवानगी न घेता मनमानी पद्धतीने प्लॉटिंग करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

           नियम व कायदे धाब्यावर बसवून या जमिनीत प्लॉट तयार करून विक्री केली जात आहे.त्यामुळे अनभिज्ञ नागरिकांची सरळसरळ फसवणूक होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.ग्रीन झोनमध्ये प्लॉटिंग करण्यास कायदेशीर परवानगी नसतानाही संबंधितांनी धनवान मातब्बर लोकांनी व राजकीय नेत्यांनी बेकायदेशीररीत्या  सुरू ठेवली आहेत.या प्रकरणी महसूल व भू -नगर रचना  विभागाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. “प्रशासन राजकीय दबावाखाली आहे का?” असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.सांगोला तालुक्यातील सुजाण नागरिकांनी जिल्हाधिकारी,उपजिल्हाधिकारी व प्रांत अधिकाऱ्यांकडे,भू नगर रचना विभागाकडे या बाबत मागणी केली आहे की,ग्रीन झोनमधील बेकायदेशीर प्लॉटिंग करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी.


पुढील भाग नंबर - 8

माणदेश मैदान न्युज 

"सांगोल्यात ग्रीन झोनमध्ये बेकायदेशीर प्लॉटिंग ; धनदांडग्यांवर ED, CBI चौकशीची मागणी..!"


Post a Comment

0 Comments