सांगोला तालुक्यातील संविधानिक पदावरील लोकसेवकांकडून पत्रकारास गुन्हा दाखल करण्याची धमकी..!
माणदेश मैदान न्युज / (कार्यकारी संपादक)
सांगोला तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.एक संबंधित पत्रकार हे स्थानिक तहसील कार्यालय सांगोला येथे माहिती अधिकार कायद्याच्या माहिती घेण्यासाठी गेले असता त्या विभागातील प्रमुख प्रशासनातील एक संविधानिक पदावर कार्यरत असलेल्या लोकसेवकांनी एका पत्रकाराला कलम BNS 132 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.पत्रकाराने प्रशासनाशी संबंधित गंभीर बाबी उघड केल्याने हा दबाव आणल्याची चर्चा सुरू असून, या प्रकारामुळे पत्रकार सुरक्षेचा व भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्थानिक पत्रकार संघटनांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित लोकसेवकांवर कारवाईची मागणी केली आहे.त्या संबंधित संविधानिक पदावर कार्यरत असणाऱ्या लोकसेवकाची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर व प्रांत अधिकारी मंगळवेढा यांच्याकडे त्या संबंधित अधिकाऱ्यावर खातेनिहाय चौकशी करून खात्यातून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

!doctype>
Post a Comment
0 Comments