सांगोल्याचे विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख हे लोकांच्या मदतीला धावून गेले ; स्वतः पाण्यात उतरून व प्रशासकीय अधिकाऱ्यासह ग्रामीण भागात भेट.
माणदेश मैदान न्युज:- (वाहिद आतार)
काल दि.१८.०९.२०२५ रोजी सायंकाळी पडलेल्या अती मुसळधार पडलेल्या पावसामुळे सांगोला शहरासह इतर ग्रामीण परिसरात आलेल्या पुरस्थितीमुळे स्थानिक नागरिक मोठ्या अडचणीत सापडले.यावेळी विद्यमान आमदारांनी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत ग्रामस्थांची भेट घेऊन आवश्यक त्या उपाययोजना त्वरित राबविण्याचे आदेश आमदार साहेब यांनी दिले.स्थानिक प्रशासन,कार्यकर्ते व ग्रामस्थांसोबत आमदार साहेब हे स्वतः मुळधार पावसामुळे पडलेल्या पाण्यात उतरले आणि अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासह आवश्यक मदत पोहोचवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.आमदार बाबासाहेब देशमुख यांनी स्नानिक नागरिकांच्या अडी-अडचणी जाणून घेत त्वरित मदतकार्य सुरू केले.सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन देत आमदारांच्या या कामगिरीचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले.

!doctype>
Post a Comment
0 Comments