Type Here to Get Search Results !

No title

 स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान कोळे (ता.सांगोला) येथे संपन्न.



माणदेश मैदान न्युज :- 
(कार्यकारी संपादक :- वाहिद आतार)

        महिला आरोग्य, तपासणी व पोषणाला प्राधान्य देत “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” अंतर्गत कोळे येथील शासकीय दवाखान्यात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.या भव्य अभियानात रक्तदाब, मधुमेह, नेत्र व दंत तपासणी, स्तन व गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी, क्षयरोग तपासणी, गरोदर महिलांची प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण, रक्त व हिमोग्लोबिन तपासणी अशा विविध आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या. यासोबतच सिकल सेल कार्ड, माता व बालसुरक्षा (एमसीपी) कार्ड, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना नोंदणी, पोषण ट्रॅकर नोंदणी, टेक-होम राशन (THR) वितरण, रक्तदान शिबीर, निक्षय मित्र स्वयंसेवक नोंदणी, आयुष्मान वय वंदना कार्ड, अवयवदान नोंदणी यांसारखे उपक्रम राबविण्यात आले.
        विशेष या उपक्रमांत मासिक पाळी स्वच्छता व पोषण मार्गदर्शन, गरोदर व स्तनदा मातांना योग्य आहाराविषयी सल्ला तसेच स्थानिक आहाराला प्रोत्साहन या गोष्टींवर भर देण्यात आला.
         कार्यक्रमासाठी डॉ. संदीप देवकते (तालुका वैद्यकीय अधिकारी), सौ.मेघना देवकते (स्त्रीरोग तज्ञ),डॉ.प्रियंका होनमाने (दंतचिकित्सक), डॉ.श्रीकांत कुलकर्णी,डॉ. सादिक पटेल आदी तज्ञ उपस्थित होते. तसेच उपसरपंच शिवाजी हातेकर, प्रतिष्ठित नागरिक बीरा आलदर पंच,संदीपआलदर,मारुती सरगर, मुख्याध्यापक विद्यामंदिर लांडगे सर,कोळेसह इतर ग्रामीण पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांनी सक्रिय सहभाग घेतला.या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश देण्यात आला.
       स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान शिबिराचे यशस्वी आयोजन डॉ.दिनेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. डॉ.विकास माने,गटप्रवर्तिका व परिचर राजेंद्र जाधव,बाबर मामा,मल्लु कोंपे हे देखील उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments