सांगोला तालुक्यातील महूद बु. येथे मंगळवार दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन
सांगोला (प्रतिनिधी) – सांगोला तालुक्यातील महूद बु. येथे मंगळवार दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव महूद बु. येथे मोठ्या जल्लोषात पार पडणार असून, सांगोल्याच्या संघर्ष पुत्राची दहीहंडी म्हणून या कार्यक्रमाची ओळख निर्माण होणार आहे. या कार्यक्रमासाठी ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जतचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी, पक्ष पदाधिकारी, नेते मंडळी, कार्यकर्ते यांची ही उपस्थिती लाभणार आहे.
या उत्सवात विविध पथकांमध्ये स्पर्धा होणार असून विजेत्यांसाठी भरघोस रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.
दहीहंडीच्या कार्यक्रमात दहीहंडी संघासाठी पुढील प्रमाणे बक्षीसे देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकाचे बक्षीसः १ लाख ५१ हजार १५१ रुपये आहे. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस १ लाख २१ हजार १२१ रुपये आहे. तृतीय क्रमांकाचे बक्षीसः १ लाख ११ हजार १११ रुपये देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून 'हिंदवी पाटील' यांचे खास लावणी सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे, जे उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लावण्यांचा भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे.
या दहीहंडी उत्सवाचे आयोजन युवानेते दिग्विजयदादा पाटील व शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे यांच्या पुढाकाराने होत आहे. या भव्य अशा कार्यक्रमाचे निवेदक म्हणून चंद्रकांत कोकाटे हे भूमिका बजावणार आहेत. या सांस्कृतिक आणि पारंपरिक उत्सवाला सांगोला तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

!doctype>
Post a Comment
0 Comments