Type Here to Get Search Results !

No title

 

वंचित पीडित घटकांच्या न्यायहक्कांसाठी साप्ताहिक कार्यसम्राट ने कधीच तडजोड केली नाही : रामचंद्र सरवदे.


साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राच्या विशेष अंकाचे थाटात प्रकाशन.


माणदेश मैदान न्युज:-सोलापूर (प्रतिनिधी ) 

         जन सामान्य माणसांचा बुलंद आवाज पत्रकार सुरक्षा समितीचे मुखपत्र असलेल्या  साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्रा चा ११ वा वर्धापन दिन विशेष अंकाचे विविध मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा चोथा स्तंब असून याचा वसा चळवळ ध्यास समजून निरपेक्ष,निर्भीड, सडेतोड यासाठी उत्कृष्ट मांडणी रोखठोक लेखनसाठी प्रसिद्ध असलेल्या त्याच बरोबर सोलापूर शहर जिल्ह्यातील व राज्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय निमशासकीय प्रशासकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राने सोलापूर शहर जिल्ह्यात आपली आगळी वेगळी छाप निर्माण केली आहे. समाजातील वंचित पीडित घटकासाठी साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राने निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन करून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी प्रशासन दरबारात साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राने आपल्या धार- धार लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवून त्यांना न्याय देण्याची भूमिका आजपर्यंत अविरथपणे पार पाडली आहे असे प्रतिपादन पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी केलं असून साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राच्या ११ व्या वर्धापन दिन विशेष अंकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते पत्रकार महर्षी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राच्या ११ व्या वर्धापन दिन विशेष अंकाचा प्रकाशन सोहळ्यास सुरुवात केली.

      यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गणेश कारंडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी यांच्या हस्ते साप्ताहिक कार्यसम्राट वृत्त पत्राच्या वर्धापन दिन विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे म्हणाले कीसाप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राचे असंख्य वाचक असून पत्रकारिता हा व्यवसाय नसून ती सामाजिक बांधिलकी असल्याने साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राने आपली पत्रकारिता पणाला लावून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. साप्ताहिक कार्यसम्राट च्या बातमीने अनेक सर्वसामान्य नागरिकांचे व अत्याचार ग्रस्त लोकांचे प्रश्न सुटले असून सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्रा ने कधीच तडजोड केलेली नाही.या कार्यक्रमाप्रसंगी  साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा सचिव अंबादास गज्जम जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार सरचिटणीस बंडू तोडकर सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू संघटक कबीर तांडूरे समन्वयक लक्ष्मण सुरवसे कार्यकारी शहर अध्यक्ष वसीमराजा बागवान,सचिव अरुण सिडगिद्दी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद ,अमोल कुलकर्णी,सागर सब्बन श्रीनिवास पेद्दी,रमेश अपराध,सतीश गडकरी,रिजवान शेख (सर ) इम्तियाज अक्कलकोटकर पत्रकार सुरक्षा समिती पंढरपूर तालुका अध्यक्ष प्रकाश इंगोले शहर अध्यक्ष लखन साळुंखे सचिव रवींद्र शेवडे सहसचिव रामकृष्ण बीडकर उपाध्यक्ष नागेश काळे  प्रसिद्धी प्रमुख चैतन्य उत्पात ,महिबूब पठाण सह अन्य पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments