सार्वजानिक बांधकाम उपविभाग सांगोला येथे माहिती अधिकार अर्ज रखडले ; पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह..!
माणदेश मैदान न्युज
(कार्यकारी संपादक :- वाहिद आतार)
माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत सामजिक कार्यकर्ता, निर्भिड पत्रकार,पत्रकार सुरक्षा समितीचे सांगोला कार्याध्यक्ष वाहिद आतार यांनी दि.१२.०६.२०२५ रोजी सांगोला सार्वजनिक बांधकाम उपविभागात दाखल केलेले माहिती अधिकार (RTI) अर्ज रखडल्याची गंभीर बाब समोर आली आहे.माहिती अधिकार कायद्यानुसार कोणत्याही अर्जाला ३० दिवसांच्या आत प्रतिसाद देणे बंधनकारक आहे.मात्र, ठरावीक मुदत उलटूनही अर्जदारांना माहिती उपलब्ध करून दिली गेलेली नाही.
यामुळे “PWD विभाग नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराच्या हक्काला पायदळी तुडवत आहे का ?” असा सवाल उपस्थित होत असून, विभागाच्या कामकाजातील पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माहिती अधिकार कायद्याकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने, नागरिकांचा विश्वास डळमळीत होऊ लागला आहे.संबंधित जनमाहिती अधिकाऱ्यांनी तातडीने भूमिका स्पष्ट करावी आणि अर्जदारांना माहिती द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

!doctype>
Post a Comment
0 Comments