लोटेवाडी ता.सांगोला येथील स्वप्निल चव्हाण यांचे दुःखद निधन.

कोळे प्रतिनिधी :-
सांगोला तालुक्यातील जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य चे सोलापूर जिल्ह्याचे प्रवक्ते व शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते सुमित चव्हाण यांचे लहान बंधू आणि लोटेवाडी चव्हाण वस्तीवरील सतत चेहऱ्यावर हसमुख असणारा मनमिळावू स्वभावाचा असून स्वप्निल चव्हाण यांचे २९/०८/२०२५ रोजी दुःखद निधन झाले, निधना समयी त्याचे वय २५ होते. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी, आई - वडील भाऊ असा परिवार असून लोटेवाडी गावात निधन झाल्याची वार्ता समजता सर्वत्र शोककळा पसरली.तिसरा दिवसाचा रक्षा विसर्जन करण्याचा कार्यक्रम ३१/०८/२०२५ रोजी सकाळी ७.३० लोटेवाडी येथील चव्हाण वस्तीवर होणार आहे,असे त्यांच्या कुटुंबीयांनकडून सांगण्यात आले.
!doctype>
Post a Comment
0 Comments