सांगोला शहराबरोबरच इतर ग्रामीण भागांमध्ये अवैध्य धंद्यांना ऊत ; नूतन पोलिस निरिक्षक घुगे साहेब सर्व अवैध्य व्यवसायाचे कंबरडे मोडणार का?.
माणदेश मैदान न्युज (मुख्य संपादक बबन चव्हाण) :-सांगोला तालुक्यातील शहर परिसरा बरोबरच ग्रामीण भागामध्ये लपून छपून चालणारे अवैद्य व्यवसाय हे आता खुलेआम सुरू आहे. सध्या साथीच्या रोगाप्रमाणे फोफावत असलेला खासगी सावकारकीचा व्यवसाय, यासह गल्लीबोळात चालणारा मटका व अवैध दारू विक्री,वाळू गुटखा व्यवसाय ही गंभीर समस्या बनत चालली आहे.
जुगार,मटका यामुळे श्रीमंत होण्याच्या नादात अनेकांचे संसार उध्वस्त होताना दिसत आहेत.असे सर्वच अवैध व्यवसाय हे राजरोसपणे सुरू असून या धंद्यांना अक्षरशा सोन्यांचे दिवस आल्याचे दिसून येत आहेत.यामध्ये सांगोला शहरातील बीट व ग्रामीण भागातील बीट अंतर्गत पोलिस ठाणे असून त्यामधे कदाचित एकेंदिवस पोलिस अधिकारी हजर असलेला पाहवयास मिळतो. याचं कारणास्तव वाळू,मटका,जुगार, दारू, गांजा, गुटखा व्यवसाय, खाजगी सावकारी फोफावली असून अवैद्यरित्या चालणारे हे सर्व व्यवसायच उघडपणे राजरोस सुरू असतात पोलिस अधिकारी आले की तेवढाच वेळ बंद आणि पोलिस अधिकारी परत निघून गेले की अवैद्य व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू होतात म्हणजे पोलीस प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करते का ? असा संतप्त सवाल सांगोला शहरातील जनता व ग्रामीण भागातील लोक आवर्जून करीत आहेत.
सांगोला पोलीस प्रशासन यांची भूमिका ही हाताची घडी तोंडावर बोट ठेवून का गप्प बसून आहे ? पोलिस अधिकारी हे फक्त हफ्ता घेण्यासाठी येतात का ? ह्या सर्व अवैध्य व्यवसायांना नक्की आशीर्वाद कोणाचा आहे. सांगोला पोलिस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक घुगे साहेब यांनी अवैध्य व्यवसायाचे कंबरडे मोडण्यासाठी स्पेशल स्क्वाॅड स्थापना केली असून फक्त ठराव्याच ठिकाणी कारवाई केली असून यामध्ये अर्थपूर्ण वाटाघाटीकडे जास्त लक्ष असते.या स्क्वाॅड मधील नियुक्त केलेले अधिकारी यांचा कारभार हा मनमानी पद्धतीने सुरू असून तात्काळ वरिष्ठ स्तरावरून या स्क्वाॅड मधील अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी सांगोल्यातील सुज्ञ जनता करीत आहे.तसेच सांगोला शहराबरोबरच ग्रामीण भागांमध्ये अवैध्य धंद्यांना ऊत येऊ लागल्यामुळे नुतन पोलिस निरीक्षक सर्व अवैध्य व्यवसायाचे कंबरडे मोडणार का? हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

!doctype>
Post a Comment
0 Comments