कोळे ता.सांगोला येथे घडले पशु - पक्ष्याविषयी घडले माणुसकीचे दर्शन ; (सामजिक कार्यकर्ते) अनिल येडगे.
कोळे प्रतिनिधि :-दि.२२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास कोळे ता.सांगोला येथील महादेव डि.पी वरील ट्रान्सफॉर्मर मध्ये अडकल्यामुळे एका माकडाला जोरदार विजेचा शॉक लागल्याने ते बेशुद्ध अवस्थेत वरती अडकून राहिले होते , तेव्हा जमलेले ठराविक नागरिक हे तेथे वरती काहीतरी पाहत असल्याचे आपल्या घराकडून गावाकडे जाणाऱ्या अनिल येडगे यांच्या लक्षात आले, ते स्वतः विद्युत ठेकेदार असल्याने आणि विद्युत शेत्रात पारंगत असल्याने त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता विद्युत पुरवठा बंद केला.
तेथे उपस्थित असलेले दुर्वास शेटे, रामभाऊ आलदर यांच्या मदतीने ते माकड खाली घेतले तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांनी कोळे येथे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ.नेहा गायकवाड यांना सदर घटनेची तात्काळ माहिती दिली आणि स्वतः अनिल येडगे माकड घेऊन पशुवैद्यकीय दवाखाना कोळे येथे पोहचले डॉ. नेहा गायकवाड यांनी आपली जबाबदारी ओळखून त्यांनी त्वरित डॉ.अमोल पोपट वाघमोडे यांना पाठवून दिले आणि वेळेवर सदर माकडाला उपचार केल्यानंतर एका तासाच्या फरकाने ते हळू हळू शुध्दीवर आले व उठून बसले आणि लगेच झाडावरती जाऊन बसले तेव्हा मुक्या जीवाचा जीव वाचल्याने सर्वांना एक सुखद धक्का बसला.यामुळे सदर घटनेत सर्वांनी प्रयत्न केल्यामुळे कोळे येथे एक प्रत्यक्ष पशु - पक्ष्याविषयी माणुसकीचे दर्शन घडून आले.सर्व सामान्य जनतेमधून या केलेल्या कार्याविषयी समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

!doctype>
Post a Comment
0 Comments