Type Here to Get Search Results !

लक्ष्मीनगर गावामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई अहो पाणी देता का पाणी अशी म्हणायची वेळ गावच्या नागरिकावरती आली आहे.

 लक्ष्मीनगर गावामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई अहो पाणी देता का पाणी अशी म्हणायची वेळ गावच्या नागरिकावरती आली आहे.

गावचे सरपंच तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव नाही नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया 

सांगोला प्रतिनिधी / लक्ष्मीनगर गाव हे शिरभावी पाणीपुरवठा योजना बंद झाल्यापासून गेले अनेक महिने झालं पाण्यासाठी वन वन करत आहे गेले अनेक महिन्यापासून  पिण्याच्या पाण्याच्या सोयीपासून लक्ष्मी नगर गाव हे वंचित आहे, गेल्या अनेक महिने लक्ष्मीनगर येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असताना याची जाणीव लक्ष्मीनगरचे सरपंच ग्रामपंचायत अधिकारी  यांना असताना सुद्धा जाणून बजून लक्ष्मी नगरच्या जनतेला  त्रास देण्याच्या हेतूने  याच्याकडे दुर्लक्ष केले आहे. म्हणून लक्ष्मीनगर गावच्या सरपंचाना पिण्याच्या पाण्याची सोय करता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी गावामध्ये चर्चा सुरू आहे . तसेच वरिष्ठ अधिकारी माननीय जिल्हाधिकारी साहेब सोलापूर, पंचायत समितीचे माननीय गट विकास अधिकारी सांगोला, तसेच सांगोला तालुक्याचे माननीय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी स्वतः लक्ष्मीनगर गावाकडे  लक्ष देणे गरजेचे आहे असे गावच्या नागरिका मधून बोलले जात आहे. गेल्या वर्षी लक्ष्मीनगर ग्रामपंचायत वरती महिलांनी घागरी घेऊन मोर्चा काढला होता उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवते हे माहित असून सुद्धा सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना याचे गांभीर्य वाटले नाही. गेले अनेक महिन्यापासून पिण्याच्या पिण्याच्या पाण्याची  सोय व्हावी म्हणून कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले नाहीत. लक्ष्मीनगर  पाणीपुरवठा विहिरीमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत नसल्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून लक्ष्मीनगर येथील नागरिकांचे  पाण्या वाचून हाल होत आहेत.


 लक्ष्मीनगर  येथील एका शेतकऱ्याने गावच्या नागरिकांचे पाण्या वाचून  हाल होत असलेले  पाहून आपल्या शेतीला बाहेरून आणलेले पाणी गावातील गोरगरीब जनतेला देऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे परंतु कडक उन्हाळा आणि लाईटीचा लपंडाव चालू असल्यामुळे त्यांच्याच शेतीला पाणी कमी पडू लागले आहे तरीपण तो शेतकरी अधून मधून गावाला पाणी देऊन गावाची तहान भागवत आहे.लक्ष्मीनगर ग्रामपंचायत गेल्या अनेक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची सोय करू शकलेली नाही परंतु येणाऱ्या निवडणुकीत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केलेले आहे पण पिण्याच्या पाण्यावरती कोणीच बोलत नाही. 


 सांगोला तालुक्यासह लक्ष्मीनगर गावामध्ये  जल जीवन योजनेचे काम काही महिन्यापूर्वी चालू होते परंतु आज तागायत लक्ष्मीनगर गावाला पिण्याच्या पाण्याची सोय जलजीवन योजने मार्फत लाखो रुपये खर्च करून सुद्धा झालेली नाही त्यातच शिरभावी पाणीपुरवठा योजना बंद आहे, शिरभावी पाणीपुरवठा योजना  बंद असल्यामुळे लक्ष्मीनगर  गावच्या नागरिकांचे पिण्याच्या पाण्याविना गले अनेक महिन्यापासून हाल हाल होत आहेत 


विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेक आजी-माजी आमदार तसेच नेत्यांनी आपल्या भाषणातून लक्ष्मीनगरच्या पिण्याच्या पाण्याचा मुद्दा मांडला होता परंतु विधानसभा झाल्यापासून आतापर्यंत कोणत्याही आजी-माजी आमदार खासदार इतर नेत्यांनी पिण्याच्या पाण्यासंदर्भात एक शब्द सुद्धा काढला नाही याचे गांभीर्य कोणालाही नाही पिण्याचे पाणी मिळावे म्हणून कोणीही प्रयत्न  करत नाही असे लक्ष्मीनगर ग्रामस्थ मध्ये चर्चा चालू आहे आम्हाला पिण्याच्या पाण्याची तात्काळ सोय सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यनी करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे पिण्याच्या पाण्याची सोय  तात्काळ न केल्यास लवकरच  घागरी घेऊन तहसील कार्यालयावरती मोर्चा काढू असे लक्ष्मीनगर  ग्रामस्थ मधून बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments