मुस्लिमांच्या जमिनीनंतर आता ख्रिश्चनांच्या जमिनी हाडपण्याचा भाजपचा डाव ; जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक आरोप.
माणदेश मैदान न्युज (कोळे प्रतिनिधि) :-लोकसभेत आणि राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयक हे मंजूर झाल्यानंतर आता यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप करत आहे.यावरच आज शरद पवार गटाचे नेते फायरब्रँड आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केले आहे. मुस्लिमानंतर आता ख्रिश्चन लोकांच्या जमिनी हडपण्याचा डाव या सरकारचा आहे असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला.आव्हाड यांनी ट्विट केल आहे हे ट्विट चांगलच चर्चेत आल आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्रमध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अंकात ख्रिश्चन धर्मियांकडील जमिनीचा मुद्दा उचलला असून ही जमीन वक्फपेक्षा अधिक असल्याचे सदर अंकातील लेखामध्ये नमूद केले आहे.

!doctype>
Post a Comment
0 Comments