कै.बाबासाहेब करांडे यांच्या प्रथम पुण्य तिथीनिमित्त सातारकर वस्ती येथे मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप.
माणदेश मैदान न्युज:-मा.जिल्हा परिषद सदस्य कै.बाबासाहेब करांडे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त. दि.०३.०४.२०२५ रोजी सातारकर वस्ती येथील शाळेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनाजी करांडे यांचे काका कै.बाबासाहेब करांडे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त सांगोला तालुक्यातील सातारकर वस्ती जि.प. प्राथमिक शाळा येथील मुलांना शैक्षणिक लेखन साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमासाठी बाळासाहेब शेंबडे, तुळशीराम मोरे,धनाजी करांडे,पत्रकार बबन चव्हाण,पोलिस पाटील सावंत, रुपाली टोणे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.सातारकर वस्ती शाळेच्या वतीने शालेय समिती अध्यक्षांचे अभिनंदन व आभार शाळेचे मुख्याध्यापक बदडे सर,मडके सर, डाखोरे सर यांनी आभार मानले.

!doctype>
Post a Comment
0 Comments