Type Here to Get Search Results !

कवठेमहांकाळ येथे‌ होणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या‌ विभागीय मेळाव्यास कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे--आमदार बाबासाहेब देशमुख*

 *कवठेमहांकाळ येथे‌ होणाऱ्या शेतकरी कामगार  पक्षाच्या‌ विभागीय मेळाव्यास कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे--आमदार बाबासाहेब देशमुख*

शेतकरी‌ कामगार पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा शनिवार दिनांक 7/6/2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या कालावधीत  कवठेमहांकाळ येथे नवीन एस. टी .स्टॅन्ड‌.जवळ आयोजीत करण्यात आलेला आसुन

   या मेळाव्यास शेतकरी कामगार पक्षाचे सर चिटणिस भाई जयंत पाटील,मा.आमदार भाई बाळाराम पाटील,भाई  संपत बापु पवार-पाटील सौ.मानसिताई म्हात्रे ,भाई एस‌.व्हि.जाधव , अॕड.भाई राजेंद्र कोरडे,भाई.बाळासाहेब  लगारे,भाई अनिकेत देशमुख यांच्या सहित अनेक मांन्यवर उपस्थित

राहुन मार्गदर्शन करणार आहेत.

  पश्चिम महाराष्ट्र विभागीय  मेळाव्यामध्ये राज्यातील‌ अनेक महत्त्वपुर्ण विषयावरची चर्चा होणार असुन त्यामध्ये शक्तिपीठ महामार्ग व ईतर महामार्गासाठी सक्तीने भु-संपादन करण्याच्या विरोधात व त्या बाधीत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठीच्या लढा उभा करणे.त्याचबरोबर गायरान जमीनीवरील‌ अनेक दिवसांपासुन वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना त्या जागा कायमच्या त्या कुटुंबांच्या गनावावर कराव्यात तसेच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी व शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चाच्या आधारावर हमी भाव मिळावा ही प्रमुख मागणीवर चर्चा होणार आसुन महिलांच्या  सुरक्षे बरोबर महिलांचे सक्षमी करणावर भर द्यावा त्यासाठी कठोर पावले‌ उचलावीत तसेच बेरोजगारी व‌ नोकर भरती उठवावी त्याचबरोबर शेतकऱ्यांना 24 तास विज  द्यावी व सध्या जे घरगुती स्मार्ट प्रिपेड मिटर बसवण्याचे काम सुरु आहे तसे मिटर बसवण्यास  लोकांचा विरोध असताना आशा  मिटर सक्ती विरोधात आवाज उठवणे व महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करणे आशा अनेक विषयावरती विचार मंथन करुन आवाज उठविण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने या विभागीय मेळाव्याचे आयोजन केले आहे. 

      या विभागीय मेळाव्यास शेतकरी कामगार पक्षाच्या नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रा हुन वरील विषयाबाबत व इतरही आपल्या भागातील काही प्रश्न असतील तर ते मांडुन त्यावरती चर्चा घडवुन आणन्यासाठी  या महत्त्वपुर्ण आशा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन आपण सर्वांनी या मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी केले असल्याची माहीती  शेतकरी कामगार पक्षाचे प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments