शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून CBSE अभ्यासक्रम पॅटर्न लागू होणार ; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घोषणा.
माणदेश मैदान न्युज - (कार्यकारी संपादक / वाहिद आतार)राज्य सरकारने शिक्षणासंदर्भात एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला. महाराष्ट्र राज्यातील सरकारी शाळांना सी.बी.एस.ई अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. सर्वसामान्य विद्यार्थी सी.बी.एस.ई चे शिक्षण घेवू शकत नाहीत. यामुळे राज्य शासनाने महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये सी.बी.एस.ई शिक्षण सुरू करण्यासंदर्भात सुकाणू समिती नेमली होती.
राज्य अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीकडून मान्यता मिळाली. विधान परिषदेमध्ये लेखी उत्तर देत महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भातील मोठी घोषणा केली आहे. राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांना सी.बी.एस.ई अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आले असून यंदाच्या २०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून स्टेट बोर्ड शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात सी.बी.एस.ई पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.

!doctype>
Post a Comment
0 Comments