Type Here to Get Search Results !

आय.एम.डी हवामान खात्याकडून हाय अलर्ट कुठे पाऊस तर कुठे उन्हाचा कडाका वाढणार...!

 आय.एम.डी हवामान खात्याकडून हाय अलर्ट कुठे पाऊस तर कुठे उन्हाचा कडाका वाढणार...!

माणदेश मैदान न्युज:- 

          मार्च महिना सुरू झाल्यापासून तीव्र स्वरूपाचा उकाडा वाढला आहे.अनेक राज्यात सूर्य आग ओकत आहे. मात्र, कुठे उकाडा तर, कुठे पावसाची रिपरिप पाहायला मिळत आहे. देशात हवामान विभागाकडून अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार ५० ते ६० किमी वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे. नेक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.आय.एम.डीने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पश्चिम बंगाल,ओडिशा, छत्तीसगड,मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या पुढील ४८ तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

          उत्तर भारतानंतर महाराष्ट्रातही हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे.पुढील ४ दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.विदर्भातील अनेक जिल्ह्यांना आज येलो तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सध्या नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या सरीचा रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आय एम डी हवामान खात्याने वर्तवली आहे.

Post a Comment

0 Comments