जमिनीच्या नोंदीमध्ये अचानक होणाऱ्या बदलाबाबत सर्वसामान्य जनतेची नाराजी...!
(माणदेश मैदान न्युज:- वाहिद आतार)जमिनीच्या नोंदींमध्ये अचानक होणाऱ्या
बदलांबाबत अनेक नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.अनेकदा वडिलांच्या नावावर असलेली जमीन अनपेक्षितपणे इतर कोणाच्या तरी नावावर गेल्याचे प्रकरणे समोर येतात.विशेषतः शहरात राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या गावच्या मालमत्तेसंबंधी असे अनुभव येत असल्याचे आढळते.जमिनीच्या नोंदींमध्ये बदल होण्याची अनेक कारणे असू शकतात.बहुतांश प्रकरणांमध्ये वारस नोंद प्रमुख कारण मानली जाते, मात्र याशिवाय इतरही विविध घटकांचा परिणाम होतो.परिणामी, मूळ मालकाच्या नावाऐवजी इतर कोणाचे तरी नाव सातबारा उताऱ्यावर दिस हा बदल कसा होतो ? जाणून घेवू सविस्तरपणे.!
# सरकारी अधिग्रहण -
महामार्ग, रेल्वे प्रकल्प, उद्योग,धरणे आणि इतर सरकारी योजनेसाठी जमिनी संपादित केल्या जातात.जमीन मालकांना बाजारभावानुसार भरपाई दिली जाते.संपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सातबारा उताऱ्यावर त्या सरकारी प्राधिकरणाचे नाव नोंद होते.
# जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार ;
जमीन खरेदी-विक्री झाल्यानंतर अधिकृत कागदपत्रे तयार केली जातात.व्यवहाराची संपूर्ण माहिती - दिनांक, क्षेत्रफळ, व्यवहाराची किंमत – या कागदपत्रांमध्ये असते. तलाठी आणि मंडळ अधिकारी नवीन मालकाच्या नावाची नोंद सातबारा उताऱ्यावर करतात. हा बदल अधिकृतरीत्या २५ दिवसांच्या आत मंजूर केला जातो.
# वारस नोंदणी -
जमीन मालकाच्या निधनानंतर त्याच्या वारसांना मालकी हक्क मिळतो. वारसांनी ९० दिवसांच्या आत अर्ज दाखल करणे आवश्यक असते. अर्ज उशिरा दाखल झाल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते.सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, मृत व्यक्तीच्या नावाऐवजी वारसांचे नाव सातबारा उताऱ्यावर दिसू लागते.
# न्यायालयीन आदेश -
एकाहून अधिक वारस असल्यास, मालमत्तेचे योग्य विभाजन करण्यासाठी न्यायालयाचा आदेश घेत महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ नुसार, सर्व वारसांची सहमती असल्यास तहसीलदार जमीन विभागू शकतो. जर सहमती नसेल, तर हा वाद दिवाणी न्यायालयात नेला जातो. CPC कलम ५४ अंतर्गत न्यायालय अधिकृत वाटपाचा निर्णय देते, त्यानंतर प्रशासनाच्या माध्यमातून नोंदींमध्ये बदल होतो.
# बेकायदेशीर मालकी -
काहीवेळा चुकीच्या दस्तऐवजांच्या आधारे जमिनीचे अनधिकृत हस्तांतरण होते.
अशा परिस्थितीत सक्षम अधिकाऱ्याच्य आदेशानुसार मूळ मालकाचे नाव पुन्हा सातबारा उताऱ्यावर नोंदवले जाऊ शकते. पुरावे सादर करून अशा नोंदींची चौकशी करून फेरफार निश्चित केला जातो.
दरम्यान, जमिनीच्या नोंदींमध्ये होणाऱ्या अनपेक्षित बदलांमुळे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र, मालमत्तेचे सरकारी अधिग्रहण, खरेदी-विक्री व्यवहार, वारस नोंदणी, न्यायालयीन प्रक्रिया आणि सक्षम अधिकाऱ्यांचे आदेश यांद्वारे नोंदींमध्ये बदल होतो. योग्य माहिती आणि कायदेशीर प्रक्रिया समजून घेतल्यास जमिनीवरील मालकी हक्क सुरक्षित ठेवणे सोपे होते.

!doctype>
Post a Comment
0 Comments