Type Here to Get Search Results !

वाकी-शिवणे येथील सर्व अवैधरीत्या चालणारे धंदे बंद करण्यासंदर्भात ग्रामसभेचा ठराव,सांगोला पोलिस स्टेशन येथे निवेदन देवून कारवाही करण्याची ग्रामस्थांची मागणी.

 वाकी-शिवणे येथील सर्व अवैधरीत्या चालणारे धंदे बंद करण्यासंदर्भात ग्रामसभेचा ठराव,सांगोला पोलिस स्टेशन येथे निवेदन देवून कारवाही करण्याची ग्रामस्थांची मागणी.

माणदेश मैदान न्युज (मुख्य संपादक:- बबन चव्हाण)

      सांगोला तालुक्यातील वाकी-शिवणे येथे दारू,जुगार,मटका व गुटखा व्यवसाय हे अवैध्यरित्या चालू आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांना महिलांना व शाळकरी मुलांना या अवैद्य धंद्यामुळे त्रास होत असून याचा विचार करून ग्रामपंचायत येथील ग्रामसभेत अवैध्यरित्या चालणाऱ्या दारू,जुगार,मटका,गुटखा हा अवैध्य व्यवसाय कायमस्वरूपी बंद व्हावा म्हणून ग्रामसभेने व महिला वर्ग व जेष्ठ नागरिक यांचे म्हणणे विचारात घेवून वाकी शिवणे ग्रामसभेने एकमताने ठराव मंजूर केला,असून गावातील काही अवैध्यरित्या व्यवसाय करणाऱ्या दारू विक्रेत्यांवर पोलिस रेड टाकण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांसमोरच अजित बुचडे, निलेश होवाळ, सुनील चव्हाण, सागर हेगडे, सुंदर काटे यांनी हात पाय तोडण्याची व जिवें मारण्याची धमकी दिली आहे. हा विषय अतिशय गंभीर बाब असून या वरील लोकांनपासून माझ्या व कुटुंबाच्या जीवास धोका आहे दि.२१/०३/२०२५ रोजी रात्री ११:५७ वा. सरपंच अनिल शिवाजी हंबीरराव यांना जीवे मारण्याची ऑडीओ रेकॉर्डिंग क्लिप शेतकरी कामगार पक्ष या व्हॉट्सअँप या ग्रुपवर  वायरल केले. 

          दि. २४-०३-२०२५ रोजी सकाळी ९:१३ मिनिटांनी भास्कर विठ्ठल शिंदे,धूळा विठ्ठल शिंदे,विठ्ठल दगडू शिंदे,सागर अशोक कोळेकर, या सर्वांनी मिळून तुम्हाला बगून घेईन व तुमचा परळी (बीड) सारखा खून केल्याशिवाय शांत बसणार नाही अश्या स्वरुपाची धमकी देऊन धक्काबुक्की केली. यांच्याबरोबरच अजित बुचडे निलेश होवाळ,सुनील चव्हाण,सागर हेगडे,सुंदर काटे,हिरा सुनार,सागर अशोक कोळेकर हे सर्वजन मिळून वारंवार माझा रात्री अपरात्री पाटलाग करीत आहेत हि बाब अतिशय गंभीर स्वरुपाची असून त्यांचेवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई करण्यारत यावी. अन्यथा कारवाही नाही झालीतर याचा निषेध म्हणून बेमुदत वाकी शिवणे गाव हे बंद ठेवण्याचा निर्णय वाकी शिवणे ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात येईल अशा स्वरूपाचे निवेदन सांगोला पोलिस स्टेशन चे निरीक्षक भिमराय खणदाळे साहेब यांना देण्यात आले.

Post a Comment

0 Comments