भविष्यात लवकरच MPSC मोठी भरती होणार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
माणदेश मैदान न्युज (कोळे प्रतिनिधी):-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत MPSC परीक्षेबाबत मोठी घोषणा केली असून आगामी काळात एमपीएससी परीक्षेची मोठी भरती निघणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या भरतीसाठी एमपीएससीत नवीन बदल केले जात असल्याची माहिती फडणवीसांनी सभागृहात दिली.एमपीएससी परीक्षा झाल्यावर काही विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळत नाही, त्यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. तसेच यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी एमपीएससीचा अभ्यास करूनही परीक्षा देऊ शकतात.यासाठी वर्णनात्मक परीक्षेचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली.
एमपीएसीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.ज्यांची नियुक्ती रखडली आहे, त्यांना लवकरच नियुक्ती दिली जाणार असल्याचं त्यांना सांगण्यात आलं आहे.फक्त १४ लोक राहिलेले आहेत.त्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असून बाकी सगळ्यांचे पूर्ण केले आहेत. त्यांची ट्रेनिंगची व्यवस्था केलेली आहे.१४ लोकांची देखील लवकरच करुन त्यांनाही नियुक्ती देऊ,असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
# वेळापत्रकावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?
लक्षवेधीचा रोख अतिशय योग्य आहे. युपीएससीमध्ये त्यांचं वेळापत्रक पक्क असतं. परीक्षा कधी होणार, मेन्स कधी होणार, कधी इंटरव्ह्यू होणार हे पक्क असतं. पण आपल्याकडे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर पाच-सात वर्षांनी लक्षात आलंय की, आपल्याला तारखा बदलाव्या लागतात. मुख्य कारण २०१८-१९ पासून आपल्याकडे सातत्याने वेगवेगळ्या आरक्षणांच्या प्रश्नांमुळे कोर्टाचे निर्णय येतात.एसीबीसी, इडब्यूएस, इडब्यूएसमधून एसीबीसीचा विषय समोर येतात. त्यात वेगवेगळ्या कोर्टात स्थगिती येतात. त्यामुळे जास्त वेळ लागतो.त्यामुळे पुढील काळात यूपीएससी प्रमाणे एमपीएससीदेखील योग्य प्रकारचे वेळापत्रक करण्याचा प्रयत्न असेल असे फडणवीस साहेब म्हणाले.

!doctype>
Post a Comment
0 Comments