Type Here to Get Search Results !

पशुधनाच्या (जनावरांच्या) औषधांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांना होणार हा महत्वाचा फायदा.

 पशुधनाच्या (जनावरांच्या) औषधांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांना होणार हा महत्वाचा फायदा.

माणदेश मैदान न्युज:- (वाहिद आतार)

        भारत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पशुधन आरोग्य व रोग नियंत्रण कार्यक्रमात (एल.एच.डी .सी.पी) सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील पशुधनाचे आरोग्य सुधारण्यावर भर दिला जाणार आहे.

# पशुधन नवीन सुधारणा कायदा काय ?

           सुधारित एलएचडीसीपीमध्ये राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण योजना, पशुधन आरोग्य व्यवस्थापन आणि पशुवैद्यकीय औषधांची तरतूद असे तीन महत्त्वाचे घटक आहेत. यामध्ये पशुवैद्यकीय औषधांचा स्वतंत्र समावेश करण्यात आला असून, त्यामुळे उच्च दर्जाची आणि परवडणारी औषधे पशुपालकांना / शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली जातील.

           ही योजना सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन वर्षांसाठी राबविण्यात येणार असून, यासाठी एकूण ३८८० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.यामधील ७५ कोटी रुपये पशुवैद्यकीय औषधांच्या विक्रीसाठी अनुदान स्वरूपात दिले जाणार आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध होतील.


# रोग नियंत्रण आणि पशुधन संरक्षण.

         जनावरांमध्ये विविध रोगांमुळे उत्पादनक्षमतेवर परिणाम होतो आणि पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. एल.एच.डी.सी.पी.च्या अंमलबजावणीमुळे लसीकरण, देखरेख आणि आधुनिक आरोग्य सेवांद्वारे रोग नियंत्रण शक्य होणार आहे.


# ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी संजीवनी.

           पशुधन योजना ही योजना जनावरांच्या आरोग्यात सुधारणा घडवून उत्पादनक्षमता वाढवेल, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल आणि स्थानिक उद्योजकतेला चालना देईल. तसेच, पशुपालकांचे आर्थिक नुकसान कमी करण्यास मदत करून देशातील पशुधन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यास हातभार लावेल.

Post a Comment

0 Comments