Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्यातील सततच्या वातावरणातील बदलांमुळे उन्हाचा कडाका वाढला...!

 महाराष्ट्र राज्यातील सततच्या वातावरणातील बदलांमुळे उन्हाचा कडाका वाढला...!

माणदेश मैदान न्युज (कोळे - वाहिद आतार)

          महाराष्ट्र राज्यातील वातावरणातील सततच्या बदल झाल्यामुळें उन्हाचा होताना दिसत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा

चटका वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.आज सोलापुरात जिल्हात विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे, आज सोलापुरचा पारा 41.1 © अंशावर पोहोचला आहे. मध्येच उष्णता तर थंड वातावरण बघायला मिळतंय. सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तापमानात सातत्याने वाढ देखील होताना दिसतेय.भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोलापूर,कोल्हापूर,सांगली,सातारा,उस्मानाबाद व विदर्भात उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे.दमट वातावरणाचा फटका आंबा, काजू, जांभूळ या पिकांना बसण्याची शक्यता आहे.

           सध्यातरी राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे तर कुठं सध्या ढगाळ वातावरण होत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. अशा या बदलत्या वातावरणाचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा हा 35 °© अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळं पिकांना याचा फटका बसत आहे. तसेच वाढत्या उष्णतेबरोबरच राज्याच्या अनेक भागात पाण्याची टंचाई देखील निर्माण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी टँकर सुरु करण्याची वेळ सरकारवर आली आहे. आणखी एप्रिल आणि मे हे दोन महिने कडक उन्हाचे आहेत.

Post a Comment

0 Comments