Type Here to Get Search Results !

कोळे येथील दत्तात्रय माने यांना राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल कोळे व्यापारी संघटनेकडून भव्य सत्कार.

 कोळे येथील दत्तात्रय माने यांना राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल कोळे व्यापारी संघटनेकडून भव्य सत्कार.

कोळे प्रतिनिधि :- 

         गेल्या ६ वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल मिडिया क्षेत्रात आपल्या निर्भीड बातम्यासाठी प्रसिद्ध असणारे सी.बी.एस न्युज मराठी सामाजिक बांधिलकी जपत सातत्यपुर्ण उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन,सीबीएस न्युज मराठी च्या वतीने आपल्या कार्याचा गौरव आदर्शसेवा रत्न पुरस्कार २०२५ मधील आदर्श उद्योगरत्न पुरस्काराने दत्तात्रय विष्णू माने यांना दि.०२.०२.२०२५ रोजी सांगोला येथे सन्मानित करण्यात आले. 

    यांना मिळालेल्या राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार निमीत्ताने कोळे व्यापारी संघटनेकडून भव्य सत्कार करण्यात आला यावेळी उध्दव करांडे,आकाश तेली,फिरोज आतार,सोमा शेटे,गणेश पोरे,सौरभ वसमाळे,नारायण आलदर,बाळासाहेब सरगर,दिलीप देशमुख,अनिल लोटके,पिंटू शिलवंत,महीबुब आतार,प्रमोद पोरे,अमोल पोरे व कोळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने या सत्कार सोहळ्या निमित्त उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments