Type Here to Get Search Results !

एकनाथ खडसे भा.ज.पा मध्ये प्रवेश करणार का ? देवा भाऊंच्या भेटीत नेमकी काय चर्चा ?.

 एकनाथ खडसे भा.ज.पा मध्ये प्रवेश करणार का ? देवा भाऊंच्या भेटीत नेमकी काय चर्चा ?.

माणदेश मैदान न्युज (सांगोला प्रतिनीधी) :- 

           महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी मंत्री आणि आमदार एकनाथ (नाथाभाऊ) खडसे यांनी आज सागर बंगल्यावर भेट घेतली.या भेटीनंतर पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे.मात्र भाजपातील पक्षप्रवेश करण्याच्या चर्चावर नाथाभाऊंनी स्वतः स्पष्टीकरण देत होणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

           जळगांव मतदारसंघातील विकासकामांच्या चर्चेबाबात फडणवीस यांची भेट घेतल्याचे एकनाथ खडसे म्हणाले की देवेंद्र फडणवीसांसोबत भाजप प्रवेश किंवा कोणतीही राजकिय चर्चा झाली नसल्याचेही खडसेंनी सांगितले."माझ्या मतदारसंघात सहकारी तत्वावर सूत गिरणी, मंदिर, इंजिनिअरींग कॉलेज असे काही विषय आहेत. मी त्यांना पत्र दिलं. पण राजकीय विषयांवर कुठली चर्चा झाली नाही" असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी खासदार आणि केंद्रात मंत्री असलेल्या सून रक्षा खडसे यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळी सुद्धा एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असल्याची चर्चा चांगलीच राजकिय वर्तुळात रंगली होती. तर त्यावेळी त्या फक्त चर्चाच राहिल्याचे पाहायला मिळाले होते.

Post a Comment

0 Comments