२०२५ मधिल अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी १० मोठ्या घोषणा ; अर्थमंत्री निर्मला सीतारामन.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत दि.०१.०२.२०२४ रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला.यावेळी निर्मला सीतारामण यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करताना मोदी सरकारने या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना झुकतं माप दिल्याचे पाहायला मिळत आहे.यंदाच्या अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी नव्या योजनेची घोषणा केली आहे. आता एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा फायदा होणार आहे. दरम्यान, १०० जिल्ह्यांसाठी धनधान्य कृषी योजना राबवण्यात येणार आहे.
राज्यांच्या सहाय्याने प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला बळकटी देण्यात येईल.किसान क्रेडिट कार्डची तीन लाखांची पाच लाखांवर करण्यात आली आहे. डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी आत्मनिर्भरता मिशन राबवण्यात येईल.तूर, उडीद आणि मसूर डाळींच्या उत्पादनासंदर्भात विशेष लक्ष दिले जाणार आहे. नाफेड, एनसीसीएफकडून डाळींची खरेदी केली जाणार आहे.कापसाचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येईल. तर कापसाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी विशेष मिशन राबवण्यात येईल. पूर्व भारतात युरिया प्लांट सुरू करण्यासाठी देखील योजना आखण्यात आली आहे.
!doctype>
Post a Comment
0 Comments