"सांगोल्याचा बिहार झाला की काय" ? सर्वसामान्य जनतेमधून जोरदार चर्चा,सांगोला तालुक्यात "खाकी" वर्दीचा धाक "कमी" होतोय..!
सांगोला तालुक्यात एकतर सर्वसामान्य व्यापारी हे धंदे नसल्यामुळे हैराण आहेत आणि दुसरं म्हणजे आता चोऱ्या सुरू झाल्या आहेत, त्यामुळे व्यवसाय सुरू ठेवायचा की बंद करायचा असा प्रश्न अनेक व्यापारी बांधवांसमोर निर्माण झाला आहे. कारण यापूर्वी झालेल्या बहुतांश चोऱ्यांचा तपास अद्याप लागलेला नाही हे विशेष.
सांगोला तालुक्यासह इतर ग्रामीण भागामध्ये चोऱ्यांचे सत्र सुरू झाल्यामुळे यापुढे चोऱ्या होणार नाही याची शाश्वती देता येणार नाही. त्यामुळे यापूर्वी ज्या प्रमाणे रात्रीची गस्त सुरू होती त्या प्रमाणे पोलिस गाडीचा राउंड सुरू करणे आवश्यक झाले आहे. व्यापारी वर्गात भितीचे वातावरण असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चोरीचा तपास करण्याबाबत व रात्रीची गस्त सुरू करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
"खाकी वर्दीचा धाक राहिला नाही"...!
सांगोला शहरीभाग व ग्रामीण परिसरात मटका,जुगार,दारू,वाळू माफिया, खाजगी सावकारी, लॉज वरील अवैध चालणारे धंदे तर राजरोसपणे उघड सुरू होतेच परंतू आता चोरट्यांनाही सांगोला पोलीस अधिकारी किंवा ठाणे प्रमुखांचा धाक राहिला नाही असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. भिमराव खनदाळे साहेब आल्यापासून सांगोला तालुक्यातील काही तरी चित्र बदलेल, अवैध धंदे बंद होतील, चोऱ्या होणार नाही अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त करण्यात येत होती. परंतू बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असाच काही प्रकार झाल्याचे नागरिक बोलत आहेत.
सांगोला पोलिस स्टेशन चे सर्व अधिकारी वर्ग जाणून बुजून तर दुर्लक्ष करीत नाहीत ना...? असा प्रश्न सर्वसामान्य सांगोला तालुक्यातील जनता करीत आहे.
सांगोला तालुक्यात व्यापारी दुकाने मोठया प्रमाणावर आहेत. बँका, पतसंस्था, शाळा, महाविद्यालय आहेत. तरीही पोलीस अधिकारी यांचे दुर्लक्ष का आहे ? दिवसाढवळ्या एका वयोवृद्ध महिलेला कार गाडीमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने धाक दाखवून त्या महिलेचे दागिने लुटतात नक्की सांगोल्याचा बिहार होतो की काय ? असा सवाल सर्वसामान्य जनता करीत आहे.

!doctype>
Post a Comment
0 Comments