Type Here to Get Search Results !

संजय गांधी निराधार योजनेच्या त्रुटींची पूर्तता आधार सिडींग न केल्यास लाभार्थ्यांचं अनुदान बंद होणार ? मार्च महिन्यापूर्वी करावं लागणार महत्त्वाचं काम.

 संजय गांधी निराधार योजनेच्या त्रुटींची पूर्तता आधार सिडींग न केल्यास लाभार्थ्यांचं अनुदान बंद होणार ? मार्च महिन्यापूर्वी करावं लागणार महत्त्वाचं काम.

        माणदेश मैदान न्युज:-(कार्यकारी संपादक 
            वाहिद आतार)मो.9922270309

      संजय गांधी निराधार योजने मधील ज्या महिलांकडू ई - केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाणार नाही, त्यांचा लाभ मार्च महिन्यापासून बंद होणार आहे.केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करण्यात येत आहे. विविध योजनांच्या लाभासाठी देखील आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करणं आवश्यक करण्यात आलं आहे. याशिवाय आधार कार्ड आणि बँक खातं देखील लिंक करण्यात येत आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना देखील आधार कार्डसह केवायसी पूर्ण करावं लागणार आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये ज्या महिलांचं केवायसी प्रकिया पूर्ण झालेलं नाही ते लवकर करुन न घेतल्यास मार्च २०२५ पासून अनुदान मिळणं बंद होणार आहे.

      केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून निराधार महिलांना प्रत्येक महिन्यास मदत दिली जाते.या योजनेस श्रावण बाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजना म्हटलं जातं. मात्र या योजनेतील महिलांना आता मदत मिळण्यासाठी ई - केवायसी करणे बंधनकारक केलं आहे. अन्यथा मार्च २०२५ नंतर मिळणारी मदत बंद होणार आहे.

Post a Comment

0 Comments