Type Here to Get Search Results !

विधानसभा अध्यक्ष पदी राहुल नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार का,पत्ता कट होणार..?

 विधानसभा अध्यक्ष पदी राहुल नार्वेकरांना  पुन्हा संधी मिळणार का,पत्ता कट होणार..?

कोळे प्रतिनिधी : 

          विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी येत्या ८ डिसेंबर विधानसभा अध्यक्ष पदी राहुल नार्वेकरांना  पुन्हा संधी मिळणार का,पत्ता कट होणार..?२०२४ रोजी उमेदवारी अर्ज भरण्यात येण्याची माहिती समोर येत आहे. भारतीय जनता पार्टीकडून येत्या ८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज भरण्यात येणार आहे.अर्ज भरण्याच्या प्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ९ डिसेंबर २०२४ रोजी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्षपदांसाठी राहुल नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार का ? हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. 

          आज महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांनी शपथ घेतली. राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी कालिदास कोळंबकर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामुळे आता राहुल नार्वेकर यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा रंगली आहे.उद्यापासून तीन दिवसीय अधिवेशन सुरू होणार आहे.या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येते.ही शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड करणे गरजेचे असते.त्यानुसार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Post a Comment

0 Comments