सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजी (बापू) पाटील यांच्या पुतण्याच्या गाडीवर हल्ला ; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ...!
सांगोला प्रतिनिधी /सांगोला तालुक्यातील एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे नेते व माजी आमदार शहाजी (बापू) पाटील यांच्या पुतण्याच्या कारवर हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे.दरम्यान या प्रकरणी अद्याप सांगोला पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला नाही अशी माहिती समजून आलेली नाही. सोलापुरात युवा शिवसेनेचे संपर्क प्रमुख सागर पाटील यांची ही MH 45 AU 1929 या क्रमाकांची कार ही सांगोल्याचे मा.आ. शहाजी (बापू) पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर उभ्या केलेल्या कारवर अज्ञात व्यक्तींने हल्ला केल्याची घटना आज शुक्रवार दि.६.१२.२०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास ही सदरची घटना घडली आहे.या हल्यावेळी कारमध्ये कोणीही नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.का..? व कोणी..? कश्यासाठी हल्ला केला असावा या प्रकरणाबाबत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

!doctype>
Post a Comment
0 Comments