लाडक्या बहिणींना ' या ' दिवशी मिळणार मोफत गॅस सिलेंडर, अन्नपुर्ण योजने बद्दल मोठी माहिती समोर ...!
माणदेश मैदान न्युज / कोळे प्रतिनिधी:-"लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहे. गॅस सिलिंडर वितरणाची तारीख समोर आली आहे."
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना मोठया प्रमाणावर राबविली आहे.या योजेअंतर्गत महिलांना १५०० ₹ दिले जातात महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर २१०० ₹ देण्याचे आश्वासन दिले होते.आता कधी महिलांना कधी २१०० ₹ मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभार्थींना मोफत गॅस सिलेंडर देखील मिळणार आहे.
महायुती सरकारच्या यशात लाडकी बहिण योजनेचा मोठा वाटा असल्याचे सांगण्यात येत आहे. निवडून आल्यानंतर २१०० ₹ हप्ता देणार असल्याचे सांगण्यात आले होते.हा हफ्ता अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर देण्यात येवू शकतो. लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेअंतर्गत वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत मिळणार असून जानेवारी २०२५ च्या दरम्यान महिलांना पाहिला गॅस सिलेंडर मोफत देण्याची शक्यता आहे.

!doctype>
Post a Comment
0 Comments