Type Here to Get Search Results !

नूतन आमदार बाबासाहेब देशमुख यांची सांगोला बस स्थानकास भेट....

 नूतन आमदार बाबासाहेब देशमुख यांची सांगोला बस स्थानकास भेट....

सांगोला (तालुका प्रतिनिधी) सांगोला मतदारसंघाचे नूतन आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला बस स्टॅण्डला भेट देवून प्रवाशी तसेच विद्यार्थी व कर्मचारी यांची भेट घेवून अडी अडचणी जाणून घेतल्या, बस स्थानकातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू असे डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले यावेळी आगार प्रमुख विकास पोफळे, पंकज तोडे, उत्तम बुरूंगले, वसेकर , बळवंतराव, एवळे यांचेसह इतर कर्मचारी, चालक,वाहक, फिटर यांचे वतीने झाडाचे रोपे देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.

        आ. डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सोमवार दि.२ डिसेंबर रोजी सांगोला बस स्थानकास सदिच्छा भेट , यावेळी त्यांनी सांगोला बस डेपो, बस स्थानकाची पाहणी केली बस डेपोतील वाढलेली चिलार झाडे तसेच स्थानकातील तुंबलेल्या गटारी नगर परिषदेच्या सहकार्याने स्वच्छ करा, शौचालये दररोज स्वच्छ करा अशा सूचना दिल्या काही अडचण आल्यास मला स्वतः फोन करा, यावेळी आगार प्रमुख पोफळे यांनी सांगोला आगारास एसटी बस कमी आहेत ,नवीन वीस एसटी बसची आवश्यकता असून त्या मिळाल्यास अडचणी दूर होतील  तर आगारात पुरेशा पाण्याची आवश्यकता असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले, यावेळी विद्यार्थिनींनी बस वेळेवर येत नाहीत, तसेच घरी जातानाही वेळेवर बस येत नाहीत, दोन, दोन तास बसची वाट पाहावी लागते अशा तक्रारी मांडल्या यावर आगार प्रमुख पोफळे यांनी बस वेळेवर सोडण्याचा प्रयत्न करू असे सांगितले तर आ.देशमुख यांनी अडी अडचणींचे निवेदन मला द्या मी त्याचा पाठपुरावा नक्की करेन असे सांगितले.

Post a Comment

0 Comments