Type Here to Get Search Results !

शरद पवार यांची EVM मशिन वर शंका ; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चोख प्रत्युत्तर...!

 शरद पवार यांची EVM मशिन वर शंका ;  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चोख प्रत्युत्तर...!

सांगोला प्रतिनिधी:- 

            विधानसभा निवडणुकीत मतांची आकडेवारी बद्द्ल महाविकास आघाडी चे देशाचे नेते शरद पवार साहेबांनी महायुती वर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय, विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून शारद पवारांनी महायुतीवर हल्लाबोल केला होता. शरद पवारांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. विधानसभेत मिळालेल्या मतांच्या आकडेवारीनुसार शरद पवार व देवेंद्र फडणवीस यांचेमध्ये जुंपली आहे. आपल्या उत्तरात देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे समोर थेट लोकसभेचा थेट हिशोब मांडला.

           कोल्हापूर येथील पत्रकार परिषद बोलताना शरद पवारांनी विधानसभेतील निकालात घोळ झाल्याचां आरोप केला होता.मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत ,कमी मते मिळालेनंतरही शिंदे गट आणि अजित पवार यांची सर्वाधिक उमेदवार निवडून आले असण्याची आरोप शरद पवार यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्यात काँगेस आय पक्षाला ८० लाख मते आहेत आणि काँगेस चे १५ उमेदवार निवडून आलेत 

      राज्यात काँग्रेस पक्ष यांना ८० लाख मते आहेत आणि काँगेस चे १५ उमेदवार निवडून आलीत.तर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गटाला ७९ लाख मते मिळाली आहेत, म्हणजेच काँग्रेस पक्ष यांच्यापेक्षा एक लाख मते कमी पडली आहेत.तरीही त्यांचे ५७ उमेदवार निवडून आले आहेत.तर शरद पवार गटाला ७२ लाख मते असून आमचे १० उमेदवार निवडून आलेत,त्याच बाजूला अजित पवार गटाला ५८ लाख मते आहेत.तरी त्यांचे ४१ उमेदवार निवडून आलेत.

        शरद पवार यांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती पोस्ट करत त्यांना उत्तर दिलंय. यावेळी फडणविस यांनी पोस्ट कतर त्यांना चोख प्रतिउत्तर दिलंय.यावेळी देवेंद्र फडणविस यांनी लोकसभेची निकालाची आकडेवारी मांडली आहे. तसेच त्यांनी जनतेची दिशाभूल, फसवणुक करू नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत झालेला पराभव मान्य करून स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल असा टोमनाही त्यांनी शरद पवारांना लगावलाय.

Post a Comment

0 Comments