Type Here to Get Search Results !

ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदी बाबासाहेब वाघमारे यांची नियुक्ती...!

 ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदी बाबासाहेब वाघमारे यांची नियुक्ती...!


सांगोला वार्ताहर :-  गोर - गरीब, गरजु,सोशित,पिडीत जनतेला न्याय मिळवुन देण्यासाठी व व्यापक जनहितासाठी उपेक्षित घटकांना समान कायद्याचे न्याय मिळवून देण्यासाठी व भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टी सतत काम करत असते.ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रा.आनंद सुर्वे यांनी सांगोला तालुक्यातील बाबासाहेब वाघमारे यांची पशिम महाराष्ट्र सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.

        यावेळी बोलताना भारतीय संविधान व भारतीय कायदा याची योग्यरीत्या व संविधानिक पद्धतीने अंमलबजावणी करून सर्व सामान्य जनतेला योग्य न्याय देण्याचे काम करेन असे बाबासाहेब वाघमारे  यांनी ग्वाही दिली.ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीसपदी बाबासाहेब वाघमारे यांची नियुक्ती झाल्यामुळे पूर्ण पश्चिम महाराष्ट्र मधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

Post a Comment

0 Comments