Type Here to Get Search Results !

*डॉ.आंबेडकर संस्था आणि केंद्र सरकारने केला "बालविवाह मुक्त भारत" अभियानाचा शुभारंभ*

 *डॉ.आंबेडकर संस्था आणि केंद्र सरकारने केला "बालविवाह मुक्त भारत" अभियानाचा शुभारंभ*

प्रतिनिधी दत्ता सावंत सांगली

"जस्ट राईटस् फॉर चिल्ड्रन" ही देशव्यापी संघटना आहे आणि डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था या संघटनेची सदस्य आहे. सध्या केंद्र शासनाच्या माध्यमातून "बालविवाह मुक्त भारत" हे अभियान मोठ्या प्रमाणात उत्साहात सुरू आहे. सांगली जिल्ह्यामध्ये संस्थेने यापूर्वी 5000 पेक्षा जास्त शपथविधी घेतल्या आहेत तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये बालविवाह रोखले आहेत. 27 नोव्हेंबर 2024 रोजी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी दिल्ली येथे "बालविवाह मुक्त भारत" अभियानाचा शुभारंभ केला व बालविवाह होऊ नये यासाठी शपथ घेतली तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत जनजागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय पोर्टलचे देखील अनावरण करण्यात आले. "बालविवाह मुक्त भारत" या अभियानात शासनाने प्रत्यक्ष सहभाग घेतल्यामुळे बऱ्याच संस्था संघटनांना कामांमध्ये बळ मिळाले आहे. "जस्ट राईटस् फॉर चिल्ड्रन" या संघटनेत 216 संस्था जोडून आहेत तसेच देशभरात 416 जिल्ह्यांमध्ये बालविवाह मुक्त भारत हे अभियान मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सध्या शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये बालविवाह थांबवण्यासाठी संस्था प्रयत्न करत आहे तसेच गावागावातून ग्रामसभेमध्ये बालविवाह मुक्त गाव म्हणून ठराव मंजूर करून घेणार आहे. संस्थेच्या या कामांमध्ये शासनाचे सहकार्य लाभावे यासाठी शपथविधी घेणे ,कॅन्डल मार्च काढणे अशा प्रकारचे कार्यक्रम संस्था जिल्ह्यामध्ये राबवत आहे. बालकांचे हक्क जपण्यासाठी व त्यांचे बालपण सुरक्षित करण्यासाठी संस्था "बालविवाह मुक्त भारत" हे अभियान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी निरंतर काम करेल.   शबीना शेख सांगली

Post a Comment

0 Comments