सांगोला तालुक्यासह इतर ग्रामीण भागांमध्ये मतदान असल्याने आठवडा बाजारास भरवण्यास बंदी...!
सांगोला प्रतिनिधी /
मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य दिनांक १५ ऑक्टोंबर, २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा विहीत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे व सदर दिनांकापासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे.
मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचेकडील प्राप्त निर्देशानुसार मतदाना दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करुन मतदान प्रक्रिया निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या जाहीर कार्यक्रमानुसार सोलापूर जिल्ह्यातील मतदान दिनांक-२०.११.२०२४ रोजी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे व यास अनुसरुन सोलापूर जिल्ह्यात मतदाना दिवशी बुधवार दिनांक २०.११.२०२४ खालील तक्त्यात नमुद गावात आठवडा बाजार भरविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्याअर्थी, मी कुमार आशीर्वाद, जिल्हादंडाधिकारी, सोलापूर, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, कलम ३७ (३) व दि.मार्केट अॅण्ड फेअर अॅक्ट १८६२ मधील कलम ५ (ग) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन असा आदेश देतो की, सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदान केंद्राच्या परिसरात सोलापूर जिल्ह्यातील सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी खालील गावांचे आठवडा बाजार दि-२०.११.२०२४ रोजी मतदान असल्याने भरविण्यास मनाई करणेत येत आहे.
सांगोला तालुक्यातील मेडशिंगी
किडेबिसरी,नराळे,हंगिरगे,हाती, कडलास,नवी लोटेवाडी
अजनाळे,भोसे इत्यादी ठिकाणीं दि.२०.११.२०२४ रोजी मतदान असल्यामुळे आठवडा बाजार भरवण्यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडून मनाई आदेश पारित केला आहे.

!doctype>
Post a Comment
0 Comments