डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा निवडणुकीत विजय पक्का असल्यामुळेच नाझरे येथील शिवसेना शिंदे गटाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
सांगोला :शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नाझरे येथील शिवसेना (शिंदे गट) गटातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.
डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा झाला. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केल्यामुळे नाझरे भागातून शहाजी बापूंना मोठा धक्का समजला जात आहे.
नाझरा येथील शिवसेना शिंदे गटातून ब्रह्मदेव वाघमारे, बाळू वाघमारे, महादेव वाघमारे, लक्ष्मण वाघमारे, पप्पू वाघमारे, महेश वाघमारे, दीपक वाघमारे, राजू वाघमारे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.यावेळी डॉ बाबासाहेब देशमुख यांनी स्वागत करून शेतकरी कामगार पक्षात आपणास योग्य तो मानसन्मान दिला जाईल असे आश्वासन देवून सर्वांचे स्वागत केले.
सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये जो अनागोंदी कारभार सुरू आहे त्यामुळे जनता प्रस्थापितांना वैतागलेले असून त्यामुळे शेतकरी कामगार पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहेत. सर्वसामान्य जनतेमधून शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या बद्दल मोठी सहानुभूती दिसून येत असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत देखील शेतकरी कामगार पक्षाचा दणदणीत विजय होणार असल्याचे प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

!doctype>
Post a Comment
0 Comments