Type Here to Get Search Results !

.बाबासाहेब देशमुख यांच्या विजयासाठी सांगोल्यात भव्य पदयात्रा; पदयात्रेस तरुणांसह महिला भगिनीचा उत्स्फुर्त प्रतिसाद

 डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या विजयासाठी सांगोल्यात भव्य पदयात्रा;  पदयात्रेस तरुणांसह महिला भगिनीचा उत्स्फुर्त प्रतिसाद

सांगोला:-सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांच्या विजयासाठी सांगोल्यात भव्य पदयात्रा संपन्न झाली. पदयात्रा मार्गस्थ होताना डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांचे ठिकठिकाणी पुष्पहार घालून स्वागत करुन मतदारांनी त्यांना विजयाचा आशीर्वाद दिला.सांगोला शहरात पदयात्रेदरम्यान सर्व ठिकाणी महिला भगिनींनी औक्षण केले. सर्वच समाजबांधवांकडून डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांचे जंगी स्वागत करण्यात आले.तर विकासाची दृष्टी असलेले  डॉ.बाबासाहेब देशमुख यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्पदेखील यावेळी करण्यात आला.


सकाळी 9.30 वाजता वाजता तेली गल्ली येथील अंबिका मंदिरापासून हलगीच्या निनादात ही भव्य पदयात्रा निघाली. सदरची पदयात्रेची सुरुवात तेली गल्ली येथील श्री अंबिकादेवी मंदिरापासून करण्यात आली. पदयात्रा तेलीगल्ली, दक्षता हॉस्पीटल समोरुन बुरुडगल्ली, बज्राबादपेठ, इंदिरानगर, संजयनगर, ढेरे वसाहत, धनगर गल्ली, सनगर गल्ली, साठे नगर, भीमनगर या परिसरातून काढण्यात आली.यावेळी निवडून निवडून येणार कोण, बाबासाहेबांशिवाय दुसरे कोण, हवा कुणाची, बाबासाहेबांची, डॉ.बाबासाहेब देशमुख तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है, एकच साहेब बाबासाहेब व डॉ.बाबासाहेब देशमुखांचा विजय असो अशा घोषणा या पदयात्रेत सहभागी मतदारांनी दिल्या.डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे निवडणूक चिन्ह असलेले शिट्टी गळ्यात घालून लाल टोपी, लाल उपरणे परिधान केलेले कार्यकर्ते पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पद यात्रा कालावधीत संपूर्ण शहरात शिट्टीचा आवाज मोठा घुमत होता.


ठिकठिकाणी मतदार व कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतिषबाजीत जंगी स्वागत केले. या मतदारांना  डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांनी मतदारांना हात उंचावून अभिवादन केले. त्यांच्या आवाहनाला मतदारांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  कार्यकर्त्यांनी अनेक मतदारांच्या घरी जाऊन त्यांना  डॉ.बाबासाहेब देशमुख  यांचे माहितीपत्रक देऊन शिट्टी  या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले.


या पदयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, दत्ता सावंत, महेश नलवडे यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे व मित्रपक्षाचे पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.प्रचार, पदयात्रा, बैठका, सभा, माहितीपत्रके, सोशल मीडिया, वृत्तपत्र या माध्यमातून डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे शिट्टी हे हे निवडणूक चिन्ह मतदारसंघातील घरोघरी पोहोचले आहे.


डॉ.बाबासाहेब देशमुख हे गेल्या तीन वर्षापासून सामाजिक काम करतात. अनेक गरीब व कष्टकरी लोकांना त्यांनी मदत केली आहे. मुस्लिम असो किंवा हिंदू असो किंवा आणि कुठल्याही धर्माचा व्यक्ती असो सर्वांना आपला माणूस म्हणून त्यांनी मदत केली आहे. त्यामुळे डॉ.बाबासाहेब देशमुख यांना सांगोला शहरातून मोठे मतदान होईल असे सर्वच नागरिकांमधून सांगण्यात आले. 


चौकट:-निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाल्यापासून सांगोला तालुक्यात दमदाटीचे राजकारण सुरू आहे. ग्रामीण भागात आबासाहेबांचे किंवा माझे, अनिकेतचे फोटो स्टेटसला ठेवल्यावरती फोन करून डिलीट करायला सांगण्यात येत असून शेवटच्या जाहीर सभेत असेच एक कॉल रेकॉर्डिंग सर्वांना ऐकवणार आहे. येणाऱ्या चार ते पाच दिवसांत शेकापच्या कार्यकर्त्यांसोबत वादविवाद करून भांडणे करण्यासाठी प्रयत्न केले जातील परंतु विधानसभेची निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष व मित्र पक्षाच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत. 

डॉ.बाबासाहेब देशमुख

Post a Comment

0 Comments