*उमेद फौंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी उमेद शिष्यवृती वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न*
घोसरवाड/ प्रतिनिधी / सुनिल नाईककुरुंदवाड *समाजातील अनाथ, एक पालकत्व, गरजू होतकरू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी*
*3 लाख रुपये शिष्यवृत्ती निःचल इस्राणी फौंडेशन च्या मदतीने उमेद फौंडेशन परिवाराकडून उच्च शिक्षण घेणाऱ्या गरजू होतकरू अश्या 100 ते 125 विद्यार्थ्यांना एक मदतीचा हात गेली सहा वर्ष अविरतपणे देत आहे.*
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर साधना मंडळ कुरुंदवाड येथे शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री दिवटे गुरुजी यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. किरण पाटील सर (लेखक व कथाकार), श्री.प्रकाश गाताडे सर(संस्थापक अध्यक्ष उमेद फौडेशन), श्री महेश घोटणे सर (राज्यस्तरीय निवेदक), श्री. संतोष जुगळे सर (अध्यक्ष जुनी पेन्शन संघटना शिरोळ),श्री.श्रीकांत चव्हाण सर(मुख्याध्यापक मथुरा हायस्कूल इचलकरजी), श्री.भूपाल दिवटे गुरुजी, श्री.दानवाडे साहेब, श्री.बलवान साहेब,श्री.पाथरवट सर, महावीर कडाळे सर,श्री.आप्पासो बंडगर, श्री.सुरेश देसाई यांसह साधना मंडळाचे अनेक सदस्य व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उमेदीयन प्रीतम गवंडी यांनी उमेद फाउंडेशनच्या सुरू असलेल्या सर्व कार्याची माहिती उपस्थितीना दिली.तसेच उमेद फौडेशनचे अध्यक्ष श्री.प्रकाश गाताडे सर यांनी साधना मंडळाच्या कार्याचे कौतुक करून तरुणांना शिष्यवृत्तीचा आदर्श कसा समाजासमोर ठेवायचा हे तरुणांना सांगितले.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. किरण पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे आणि दाखल्यासहित अनमोल मार्गदर्शन केले.छत्रपती शिवराय,बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, रतन टाटा यांना समोर ठेवून जीवनाचे मार्गक्रमण करा म्हणजे कधीही वाट चुकणार नाही असे आजच्या तरुणांना आणि उपस्थित मान्यवरांना सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेश घोटणे सर यांनी केले तर आभार श्री. प्रितम गवंडी सर यांनी केले.

!doctype>
Post a Comment
0 Comments