*घोसरवाड मध्ये स्वयंपूर्ण उद्योग समूहाच्या संस्थापिका डॉ. पुर्वा बाबासाहेब पुजारी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने महिला सक्षमीकरणासाठी जनजागृती मेळावा संपन्न झाला.*
कोल्हापूर जिल्हा/ प्रतिनिधी सुनिल नाईकसध्या महाराष्टात किंबहुना देशात जे महिलांचे शोषण, अन्याय, अत्याचार यांच्या घटना घडत आहेत याचे भान ठेवून आज स्वयंपूर्ण उद्योग समूहाच्या संस्थापिका डॉ. पुर्वा बाबासाहेब पुजारी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने महिला सक्षमीकरणासाठी जनजागृती मेळावा संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरवात स्वराज्यजननी जिजाऊ आईसाहेबांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवराचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमांची प्रस्ताविक डॉ. पूर्वा पुजारी यांनी केलं.त्यांनतर कन्या विद्या मंदिर घोसरवाड शाळेच्या शिवकन्या पथनाट्य समूह यांनी प्रबोधनपर आणि उपस्थित्यांच्या डोळ्यात अंजन घालणार पथनाट्य सादर केलं.त्यांनतर स्मिता सम्यक यांनी उपस्थित महिलाना मार्गदर्शन केलं.
शांतिदूत मर्दाना आखाडा कोल्हापूर यांचा दांडपट्टा, तलवारबाजी, लाठी काठी, असे महिला संरक्षणाचे विविध प्रत्यक्षिक करण्यात आले सोबत जर गावातील महिला व युवती प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांना संस्थेच्या वतीने प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे असे डॉ पूर्वा पुजारी यांनी सांगितले.
त्यांनतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि ग्रामपंचायत सदस्या सौ उत्तरादेवी विजीतसिहं शिंदे यांनी आणि शिरोळ पंचायत समिती माजी सभापती सौ मिनाज जमादार आणि ग्रामपंचायत सदस्या मधुमती पाटील यांनी आपले मनोगते व्यक्त केले.असे कार्यक्रम गावामध्ये सतत झाले पाहिजेत असे सांगितले.
त्यांनतर डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थाच्या वतीने प्रशांत खांडेकर आणि सुरज भोसले यांनी कोल्हापूर जिल्हा बालविवाह आणि बालमजुरी मुक्त करण्याची शपथ सर्वांकडून घेण्यात आली.सुरज भोसले आभार मानले व प्रशिक्षणासाठी जास्तीत जास्त मुलींनी सहभागी होण्याचे आवाहन केलं.कार्यक्रमासाठी अंजना डवरी, पुजा चौगुले, पुजा पवार यांचे विशेष सहकार्य लाभले.

!doctype>
Post a Comment
0 Comments