सांगोला शहरी व ग्रामीण भागातील सार्वजनिक सर्व गणेश मंडळांना धार्मिक घरगुती दराने वीज पुरवठा.
सांगोला प्रतिनिधी /
सांगोला तालुक्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना विज जोडणी चा अर्ज प्राप्त होताच तात्काळ वीज कनेक्शन जोडून दिले जाईल.गणेश मंडळाच्या मागणीप्रमाणे महावितरण सांगोला कडून तात्पुरते वीज जोडणी कनेक्शन देण्यात येते.या तात्पुरत्या कनेक्शन जोडणीच्या वीज वापरासाठी धार्मिक घरगुती दराने शुल्क आकारण्यात येणार आहे.तरी सांगोला तालुक्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागांतील गणेश मंडळांनी अधिकृत विज जोडणी कनेक्शन घेऊन गणपती उत्सव साजरा करावा असे आवाहन महावितरण सांगोला यांनी केले आहे.
गणेशोत्सवाच्या दरम्यान मुसळधार व संततदार पावसाची शक्यता असल्या कारणाने सार्वजनिक गणेश मंडळांनी संभाव्य धोके टाळण्यासाठी वीज यंत्रणेची योग्य काळजी घ्यावी, मंडप व विद्युत रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी अधिकृत विद्युत कंत्राटदार यांचेकडून करून घ्यावी. गणेश उत्सवातील लोखंडी मंडपातील वीज यंत्रणेची अर्थिंग व्यवस्थित असलेली खात्री करून घ्यावी. लोखंडी मंडपातील सर्व वायरिंग ही व्यवस्थित पणे करून घ्यावी, अशा केलेल्या वायरिंग मधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तूंमध्ये विद्युत प्रवाह उतरू शकतो.हा संभाव्य धोका टाळण्यासाठी व्यवस्थितपणे त्याची काळजी घेऊन व्यवस्थित जोडणी करून घ्यावी.असे आवाहन महावितरण सांगोला यांनी केले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या दरम्यान अधिकृत वीज जोडणी कनेक्शन करून घ्यावे :- आनंद पवार ,उपअभियंता महावितरण अधिकारी सांगोला.

!doctype>
Post a Comment
0 Comments