Type Here to Get Search Results !

कुरेश कॉन्फरन्सच्या कर्नाटक उपाध्यक्षपदी सुलेमान कोलारकर !* *ॲड . सनोबर अली कुरेशी यांनी केली नियुक्ती.

कुरेश कॉन्फरन्सच्या कर्नाटक उपाध्यक्षपदी सुलेमान कोलारकर !*

*ॲड . सनोबर अली कुरेशी यांनी केली नियुक्ती.



आटपाडी  ( प्रतिनिधी )

                कुरेश कॉन्फरन्सच्या कर्नाटक राज्याच्या उपाध्यक्षपदी सुलेमान गुलाम दस्तगीर कुरेशी कोलारकर यांची सुप्रिम कोर्टात वकीली करणारे तथा कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड . सनोबर अली कुरेशी यांनी नियुक्ती केली आहे .

                कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील आटपाडीचे सादिक खाटीक यांनी सुलेमान कोलारकर यांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली होती .

                कलबुर्गी ( गुलबर्गा ) जिल्ह्यातील शहाबादचे प्रतिष्ठित समाजकारणी, राजकारणी असलेले सुलेमान कोलारकर उच्चशिक्षीत, आर्थीकदृष्टया सुसंपन्न आणि समाजाभिमुख नेतृत्व आहेत .

                शहाबाद येथील जामीया मसजीद संस्थेवर ते निर्वाचित संचालक म्हणून कार्यरत आहेत . अंजुमन उर्दू हायस्कूल शदाबादचे एक्झिकेटीव्ह मेंबर असलेले सुलेमान कोलारकर काँग्रेस आय पक्षाचे शहाबाद शहराचे नेते आहेत .

                सुलेमान कोलारकर यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे, राष्ट्रीय अध्यक्ष ॲड . सनोबर अली कुरेशी , राष्ट्रीय उपाध्यक्ष सादिक खाटीक, राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी (ऑर्गनायझेशन ) मोहंमद आस्किन कुरेशी, कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल नबी कुरेशी, प्रदेशचे उपाध्यक्ष मोहंमद इब्राहीम यांनी खास अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत . त्यांच्या निवडीचे कर्नाटक महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्रप्रदेश या राज्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे .

Post a Comment

0 Comments