Type Here to Get Search Results !

सांगोला विधानसभा काँग्रेसने लढवावी सांगोला तालुका व शहर काँग्रेस कमिटी बैठक संपन्न झाली..

 सांगोला विधानसभा काँग्रेसने लढवावी सांगोला तालुका व शहर काँग्रेस कमिटी बैठक संपन्न झाली..



सांगोला प्रतिनिधी :- सांगोला तालुका शहर व काँग्रेस कमिटीच्या पदाधिकची महत्वाची बैठक सांगोला येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सहकार विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अजयसिंह इंगवले पाटील यांच्या निवासस्थानी संपन्न झाली 

 या महिन्याची दरम्यान आगामी विधानसभा ही काँग्रेसने लढवावी अशी पदाधिकाऱ्यांचा सुरू उमटला. सांगोला तालुक्यामध्ये काँग्रेसची मोठी ताकद असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरती भारत देशाचे चांगले भविष्य घडवण्याची ताकद आहे. त्याचबरोबर खासदार प्रणिती शिंदे व मा केंद्रीय गृहमंत्री मा ना सुशीलकुमार शिंदे साहेब यांनी सांगोला तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना मते जाणून घेण्यासाठी 11 ऑगस्ट रोजी सोलापूर येथे बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत विविध ठराव पास करण्यात आले व काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. राजकुमार पवार यांच्या  उमेदवारी ची मागणी काँग्रेस पक्ष श्रे श्ठि कडे करावी. असा ठराव सर्वांमध्ये मंजूर करण्यात  आला.  या बैठकीस प्रा पी.सी झपके सर व कार्यकारी अध्यक्ष सुनील नागणे यांनी मार्गदर्शन केले.

 या बैठकीसाठी प्रमुख प्रा.  पी.सी झपके सर , राजकुमार पवार, अजयसिंह इंगवले. कार्यकारी अध्यक्ष  सुनील नागणे .शहराध्यक्ष तोहीद मुल्ला , सुनील भोरे सर , पांडुरंग माने, चंद्रकांत सोनवणे ,शेखलाल शेख, अंकुश सरगर, संभाजी सरगर, मोहन भोसले, अमर तांबोळी ,दत्तात्रेय देशमुख, आनंदराव काटे, बापूदिन शेख ,काशिनाथ ढोले, आदित्य चंदनशिवे, फिरोज मनेरी, अक्षय महामुनी, अजित चव्हाण, चांद भैया शेख, रमेश बिले, अजित मोरे, रंजीत महापुरे,  सिद्धेश्वर देशमुख.. आधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments