देवदासींच्या पुढाकाराने इनाम धामणी येथे संविधान गटाची स्थापना
मिरज प्रतिनिधी / संविधानाने दिलेले हक्क अधिकार सगळ्या समाजाला समान आहेत संविधानाने स्वातंत्र्य समता बंधुता, श्रद्धा व उपासना ,अभिव्यक्ती, न्याय, दर्जाची व संधीची समानता , स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार.
इनाम धामणी इथे देवदासी दहा ते पंधरा देवदासी आहेत यामध्ये पवित्रा बसप्पा कांबळे ,शिवानी कांबळे ,महादेवी रामा कांबळे ,लक्ष्मीबाई रामू शिंगे,कस्तुरा तमन्ना कांबळे, या महिलांच्या पुढाकाराने इनाम धामणी इथे सामाजिक कार्यकर्त्या शबाना शेख ह्यांनी देवदासी महिलांना संविधान गटाविषयी माहिती दिली
संविधान गट बनवण्याचे उद्दिष्ट
1-संविधानाची संकल्पना लोकांमध्ये रुजवणे
2-धार्मिक सामाजिक सलोखा निर्माण करणे
3-स्त्री पुरुष समानता मानणारा समाज निर्माण करणे
4-समाजामध्ये जाती धर्म व लिंग आधारित भेदभाव केला जातो अन्याय केला जातो त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी एकत्रितपणे आवाज उठवणे
5-सामाजिक सुरक्षा योजनेपासून वंचित ठेवले जाते त्यांना या योजनेचा लाभ मिळणे हा संविधानिक हक्क अधिकार आहे यासाठी जागृत करणे
विशेष आभार इनाम धामणी इथे संविधान गट सुरू करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मानतेश काबंळे ह्यांचे सहकार्य लाभले

!doctype>
Post a Comment
0 Comments